Schemes For Women: लाडकी बहीण ते सुकन्या समृद्धी... महिलांसाठी सरकारच्या या योजनेत मिळणार लाखो रुपये

Governemnt Scheme For Women: केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ते सुकन्या समृद्धी योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते.
Schemes For Women
Schemes For WomenSaam TV
Published On

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी राबवल्या गेल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्याने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. या योजनांअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. तसेच गुंतवणूकीवर कर सूटदेखील मिळते.

महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्यादेखील अनेक योजना आहेत. या योजनांमुळे महिलांना चांगला फायदा होतो. यामध्ये महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ते सुकन्या समृद्धी योजना याद्वारे महिलांना आर्थिक मदत केली जाते.

Schemes For Women
Post Office Scheme: नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, फक्त व्याजातूनच मिळणार २ लाख रुपये; जाणून घ्या कसे?

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. या योजनेचा पुढचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वर्षांच्या महिला अर्ज करु शकतात. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपये आहे त्याच कुटुंबातील महिला या योजनेत अर्ज करु शकतात.

सुभद्रा योजना (Subhadra Yojana)

ओडिशा सरकारने महिलांसाठी सुभद्रा योजना राबवण्यात आला आहे. या योजनेत लाभार्थ्यांना १० हजार रुपये मिळतात. पाच वर्षांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. महिलांना पाच वर्षांसाठी ५० हजार रुपये मिळणार आहे. २१ ते ६० वयोगटातील महिला या योजनेत अर्ज करु शकतात.

Schemes For Women
NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट (Mahila Sanman Saving Certificate)

महिला सेविंग सर्टिफिकेट योजना २०२३ साली सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महिलांना चांगले व्याज मिळते. फक्त २ वर्षांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत महिलांना ७.५ टक्के व्याजदर मिळणार आहे. देशातील कोणतीही महिला या योजनेत अर्ज करु शकतात.

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samruddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ८.२ टक्के व्याजदर दिले जाते. या योजनेत १० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. कमीत कमी २५० रुपये तर जास्तीत जास्त १,५०,००० रुपये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत मुलींना २१ वर्षानंतर गुंतवलेले पैसे मिळणार आहेत.

Schemes For Women
SBI Scheme: SBI च्या ५ जबरदस्त योजना! फक्त ४४४ दिवसांमध्ये गुंतवणूकदार होणार श्रीमंत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com