Bank Closed : मोहरम निमित्त आज बँका बंद राहणार की सुरू? घरून निघण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक नक्की तपासा

Bank Holiday Update News : मोहरम, चौथा शनिवार आणि रविवारमुळे देशातील अनेक भागांमध्ये बँका बंद राहणार आहेत. RBI च्या सुट्टीच्या यादीप्रमाणे पुढील काही दिवस शाखांमधील व्यवहार प्रभावित होऊ शकतात.
BANK HOLIDAY ALERT: BANKS CLOSED FOR THREE DAYS, CHECK RBI HOLIDAY LIST BEFORE VISITING BRANCHES
BANK HOLIDAY ALERT: BANKS CLOSED FOR THREE DAYS, CHECK RBI HOLIDAY LIST BEFORE VISITING BRANCHESSaam tv
Published On
Summary
  • देशातील अनेक शहरांमध्ये आज बँका बंद

  • पुढील ३ दिवस बँक राहणार बंद

  • इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा सुरू राहतील

India Bank Closed Today Update News तुम्हीदेखील आज किंवा पुढच्या ३ दिवसांत बँकेत काही कामानिमित्त जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. मोहरमच्या निमित्ताने आज देशभरातील अनेक सरकारी ऑफिससह बँकांनाही सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान २७ ते २९ जूनपर्यंत बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनो बँकेतील तुमची कामे काही दिवस रखडली जातील. मात्र ऑनलाईन सेवांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत सुट्टीच्या दिनदर्शिकेनुसार, मोहरम आणि आशुरानिमित्त देशातील बहुतांश प्रमुख बँकिंग केंद्रांमध्ये आज बँका बंद राहणार आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, लखनौ, पाटणा, रांची आणि रायपूर यांसह देशातील १८ प्रमुख बँकमध्ये व्यवहार ठप्प राहतील.

BANK HOLIDAY ALERT: BANKS CLOSED FOR THREE DAYS, CHECK RBI HOLIDAY LIST BEFORE VISITING BRANCHES
Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, पुढील सलग तीन दिवस अनेक ठिकाणी बँकिंग सेवा बंद राहणार आहेत. २७ जून रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील, तर २८ जून रोजी नियमित रविवारची सुट्टी असेल. त्यामुळे बँक शाखांमधील व्यवहारांसाठी ग्राहकांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

BANK HOLIDAY ALERT: BANKS CLOSED FOR THREE DAYS, CHECK RBI HOLIDAY LIST BEFORE VISITING BRANCHES
Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

याशिवाय, २९ जून रोजी संत गुरु कबीर जयंतीनिमित्त हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बँकांना सुट्टी असेल. तसेच ३० जून रोजी रेमना नी निमित्त मिझोरामची राजधानी आयझॉलमधील बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी चेक जमा करणे, रोख रक्कम काढणे किंवा इतर कामांसाठी नियोजन करूनच बँकेत जाणे आवश्यक आहे. मात्र, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com