April 1 Rule: LPG, टॅक्स, PAN आणि रेल्वे...! 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल, नव्या नियमांमुळे खिशाला लागणार कात्री

Finance News: १ एप्रिलपासून LPG दर, टॅक्स नियम, PAN कार्ड प्रक्रिया आणि रेल्वे तिकीट रद्द धोरणात मोठे बदल लागू होणार असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर होणार आहे.
Finance News
April 1 Rulegoogle
Published On

१ एप्रिल हे आर्थिक वर्ष असतं. यामध्ये नवे नियम आणि काही बदल लागू होतात. तसेच यंदाही काही मोठे निर्णय घेतले आहेत. ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशाला होणार आहे. पुढील बातमीत आपण LPG सिलेंडरच्या किमतींपासून ते आयकर नियम, PAN कार्ड प्रक्रिया आणि रेल्वेच्या तिकीटांमध्ये कोणते बदल किंवा नियमात बदल केले आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत.

LPG मध्ये होणारे बदल

सर्वप्रथम LPG, ATF, CNG आणि PNG च्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे आधीच इंधन बाजाराच्या ताणाला सामोरं जावं लागलं होतं . या पार्श्वभूमीवर तेल कंपन्या 1 एप्रिलपासून LPG सिलेंडरच्या नव्या दरांची घोषणा करू शकतात. याचा परिणाम थेट घरच्या LPGवर होऊ शकतो.

Finance News
Jio Recharge: खुशखबर! IPL पाहण्यासाठी भन्नाट ऑफर, Jioचा हा प्लॅन होतोय व्हायरल

टॅक्समध्ये होणारे बदल

टॅक्सच्या नियमात सुद्धा मोठा बदल होणार आहे. 1 एप्रिलपासून ‘आयकर अधिनियम, 2025’ लागू होणार आहे. 1961 पासून अस्तित्वात असलेला जुना कायदा बदलला जाणार आहे. नवीन करप्रणाली जास्त सोपी करण्याचा यामागचा उद्देश असणार आहे. करदात्यांवर असलेल्या नियमांचे ओझं याने कमी होणार आहे. या बदलांमध्ये Form 16 संदर्भातील नियमांमध्येही सुधारणा होणार आहेत. ITR भरण्यासाठी वापरला जाणारा Form 16 यापुढे उपलब्ध राहणार नाही. त्याऐवजी नवीन स्वरूपातील दस्तऐवज दिला जाईल. तसेच Form 16A चे नाव बदलून Form 131 करण्यात येणार असून तो संबंधित तिमाही TDS विवरणानंतर 15 दिवसांत देणे बंधनकारक असेल.

PAN कार्डाचे नियम

PAN कार्डशी संबंधित नियमही जास्त कडक होणार आहेत. 1 एप्रिल 2026 पासून PAN कार्ड बनवताना अर्जदारांना जास्त कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच रखडलेले अर्ज तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

रेल्वे तिकीटाचे नियम

दरम्यान, रेल्वे प्रवाशांसाठीही नवीन नियम लागू होणार आहेत. 1 एप्रिलपासून ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी तिकीट रद्द केल्यावर तुम्हाला कोणताही परतावा मिळणार नाही. यापूर्वी ही मर्यादा चार तास होती. आठ ते 24 तास आधी तिकीट रद्द केल्यावर 50 टक्के परतावा मिळेल, तर 24 ते 72 तास आधी रद्द केल्यावर 25 टक्के कपात होईल. 72 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तुलनेने जास्त परतावा मिळणार आहे.

Finance News
Belly Fat Loss: पोटावरची चरबी वाढत चाललीये? सकाळी १ ग्लास प्या हे ड्रिंक, आठवड्यातच जाणवेल फरक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com