अॅपलचे CEO टिम कुक यांचा राजीनामा
जॉन टर्नस हे अॅपलच्या CEO पदाची जबाबदारी सांभाळणार
टिम कुक आता Executive Chairman म्हणून अॅपलसोबत काम करणार
अॅपलच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अॅपलचे CEO टिम कुक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ३१ ऑगस्ट २०२६ हा अॅपलच्या CEO पदावरचा त्यांचा शेवटचा दिवस होता. कुक यांच्या कार्यकाळात ॲपल वॉच, एअरपॉड्स, व्हिजन प्रो, एअरटॅग्ज, ॲपल म्युझिक ही ५ प्रमुख उत्पादने सुरु करण्यात आली. तब्बल अनेक वर्षे कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर पदाचा निरोप घेताना टिम कुक भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.
पदाचा राजीनामा दिल्यानंतर टिम कुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अॅपलचे कर्मचारी, ग्राहक आणि संपूर्ण अॅपल टीमचे मनापासून आभार मानले. अॅपलसोबतचा प्रवास हा केवळ व्यावसायिक नव्हता, तर त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्याही मनातून तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले.
टिम कुक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “उद्या माझे पद बदलेल, परंतु अॅपलच्या टीमवरचे माझे जे प्रेम आहे तसेच राहील, ते कधीही बदलणार नाही. मला नेहमीच प्रेरणा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी तुमचा सदैव ऋणी राहीन, आणि आता मी माझ्या आयुष्यातील पुढील प्रवासासाठी खूप उत्सुक आहे.”
टिम कुक यांच्या या इमोशनल पोस्टनंतर जगभरातील अॅपल प्रेमींनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. टिम कुक यांच्या राजीनाम्यानंतर जॉन टर्नस हे ॲपलचे नवीन CEO म्हणून काम पाहणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.