Fraud: Android युजर्ससाठी चिंताजनक बातमी! SMSद्वारे होऊ शकतो तुमचा स्मार्टफोन हॅक, जाणून घ्या

Fraud Through SMS : अँड्रॉइड युजर्सची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. तुमचा स्मार्टफोन फक्त एका एसएमएसमुळे हॅक होऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोन युजर्संनी योग्य काळजी घ्यायला हवी.
Fraud
FraudSaam Tv
Published On

अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा वापर करुन डिजिटल बँकिग करत असाल तर वेळीच काळजी घ्या. डिजिटल व्यव्हार करताना फ्रॉड होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे.ही फसवणूक मालवेअरच्या मदतीने केले जातात.

स्कॅमर तुमच्या स्मार्टफोनमध्ये नकळत मालवेअर प्रस्थापित करतात. या मालवेअरच्या मदतीने आपली वैयक्तिक माहिती फ्रॉड करणाऱ्या लोकांना मिळते. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. असाच एक मालवेअर म्हणजे मेडुसा बँकिंग ट्रोजन. याचा वापर करुन पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत आहे.

Fraud
Petrol Diesel Rate Today: राज्यात आज एका लिटर पेट्रोल डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा एका क्लिकवर

मेडुसा म्हणजे काय?

मेडुसा हा एक टूल आहे. या टूलच्या मदतीने हॅकर्स तुमचा स्मार्टफोन हॅक करतात. हे मेडुसा बँकिंग ट्रोजन तुमच्या स्मार्टफोनमध्ये माहिती चोरतो, त्यात प्रामुख्याने बँकेच्या संबंधित माहिती मिळवतो. मेडुसा टूल तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल झाल्यावर हॅकर्संना तुमच्या स्मार्टफोनवर संपूर्ण कंट्रोल मिळते. त्यामुळे ते तुमच्या बँकेची सर्व माहिती मिळवतात.

सध्या मेडुसाचे अपग्रेटेड व्हर्जन आले आहे. हे खूपच धोकादायक आहे. यामुळे अँड्रॉइड डिव्हाइस हॅक होतो. मेडुसा हे टुल तुमच्या स्मार्टफोनमध्ये एसएमएसद्वारे इन्स्टॉल होते. एसएमस लिंकवर क्लिक केल्यावर हे टूल आपोआप तुमच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल होईल.

Fraud
ITR: आयटीआर भरल्यानंतर किती दिवसात मिळतो रिफंड? जाणून घ्या A TO Z माहिती

एका सायबर सिक्युरिटी फर्मने दिलेल्या माहितीनुसार, मेडुसा सध्या कॅनडा, फ्रान्स, इटली, तुर्की, ब्रिटन, अमेरिकेत सक्रिय आहे. सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी तुम्ही अनोळखी नंबरवरुन आलेल्या कोणत्याही एसएमएसवर क्लिक करु नका. सर्व अॅप फक्त गुगल प्ले स्टोरवरुन डाउनलोड करा. स्मार्टफोनमध्ये अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा जेणेकरुन कोणताही व्हायरस तुमच्या स्मार्टफोनमध्ये येणार नाही.

Fraud
ITR: आयटीआर भरताना 'या' १० गोष्टी कायम लक्षात ठेवा; भविष्यात येणार नाही अडचण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com