ITR: आयटीआर भरताना 'या' १० गोष्टी कायम लक्षात ठेवा; भविष्यात येणार नाही अडचण

ITR Filling News: आयटीआर दाखल करताना नेहमी अचूक माहिती भरायची असते. आयटीआर फाइल करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते जेणेकरुन भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये.
ITR Filling News
ITR Filling NewsGoogle
Published On

प्राप्तिकर विभागाने आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख जाहीर केली आहे.३१ जुलै २०२४ पूर्वी तुम्हाला आयटीआर फॉर्म भरावा लागणार आहे. मुदतीनंतर फॉर्म भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. आयटीआर भरताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर प्राप्तिकर विभाग तुमच्यावर कारवाई करु शकतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही आयटीआर भरल्यास भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

ITR Filling News
Ducati ने लॉन्च केली सर्वात महागडी बाईक, याच्या किंमतीत येईल 4 मारुती कार; जाणून घ्या किंमत
  • सर्वप्रथम योग्य फॉर्मची निवड करा. तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत, वार्षिक उत्पन्न आणि श्रेणी (पगारदार वर्ग, स्वयंरोजगार वर्ग)यावर आधारित फॉर्म निवडा. त्यानंतरच फॉर्म भरा.

  • आयटीआर फॉर्म भरताना आवश्यक सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहे की नाही हे एकदा चेक करा. तुमच्याकडे फॉर्म 16,फॉर्म 26AS,बँक स्टेटमेंट, गुंतवणुकीचा पुरावा, उत्पन्नाचा स्त्रेत यासारखी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

  • फॉर्म भरताना उत्पन्नाची माहिती द्या. पगार, भाडे, ठेवींवरील व्याज, नफा याबाबत सर्व प्रकारची माहितीचा तुमच्या उत्पन्नामध्ये समावेश करा.

  • टीडीएस तपशील चेक करा. अचूक माहितीसाठी फॉर्म 26AS मध्ये TDS तपासा.त्यानंतरच फॉर्म भरा.

  • आयकर सूट मिळवण्यासाठी दावा करणे. जर तुम्हाला तुमचा कर कमी करायचा असेल तर आयकर कलम 80C, 80D, 80E अंतर्गत सवलतींचा लाभ घ्या.

  • तुम्ही तुमच्या सर्व उत्पन्नाची माहिती द्या. ज्या उत्पन्नावर कर सूट आहे त्या उत्पन्नाचीदेखील माहिती देणे गरजेचे आहे. जेणेकरुन प्राप्तिकर विभाग व्यवस्थित पडताळणी करु शकेल.

ITR Filling News
ITR: आयटीआर भरल्यानंतर किती दिवसात मिळतो रिफंड? जाणून घ्या A TO Z माहिती
  • तुम्ही तुमच्या मुल्यांकनानुसार कर भरा. जेणेकरुन आयटीआर फाइल करताना दंड आणि व्याज टाळू शकतात.

  • गेल्या वर्षी जर तुमचे काही नुकसान झाले असेल आणि त्याचा फटका तुम्हाला यावर्षात देखील बसला असेल तर तुम्ही यावर्षीच्या उत्पन्नातून त्याची भरपाई करु शकतात.

  • तुम्ही फाइल केलेला आयटीआर अर्ज सबमिट करण्याआधी चेक करा. सर्व माहिती बरोबर असल्यास आयटीआर फॉर्म सबमिट करा.

  • आयटीआर दाखल केल्यानंतर त्याची पावती तुमच्याजवळ ठेवा. भविष्यात काही अडचणी आल्यास तुम्हाला आयटीआर भरल्याचा पुरावा दाखवणे गरजेचे असते.

ITR Filling News
Petrol Diesel Rate Today: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com