Team India Head Coach: गौतम गंभीरच होणार टीम इंडियाचा हेड कोच?बीसीसीआयने दिलीये ही सूट

Gautam Gambhir, Team India's Head Coach: आयसीसी टी-२० वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड यांचा मुख्यप्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. हे पद स्विकारण्यासाठी गौतम गंभीरला प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
Team India Head Coach: गौतम गंभीरच होणार टीम इंडियाचा हेड कोच?बीसीसीआयने दिलीये ही सूट
gautam gambhirsaam tv news
Published On

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसह राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. आता पुढील मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांचं नाव चर्चेत आहे. गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. बीसीसीआय लवकरच याबाबत घोषणा करू शकते. दरम्यान माध्यमातील वृत्तामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कोलकाता नाईट रायडर्सने गौतम गंभीरला ईडन गार्डन्सच्या मैदानावर निरोप दिला आहे.

गौतम गंभीरने आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. आता त्याला निरोप देण्यात आला आहे. यावरून स्पष्ट होतंय की, गंभीर पुढील मुख्य प्रशिक्षक होणार. कारण भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत असलेला प्रशिक्षक इतर कुठल्या संघाला प्रशिक्षण देऊ शकत नाही.

आता Revsportz च्या वृत्तात गंभीरच्या निरोप समारंभाबाबत दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मुख्य प्रशिक्षकाची घोषणा होताच अपलोड केला जाणार आहे.

Team India Head Coach: गौतम गंभीरच होणार टीम इंडियाचा हेड कोच?बीसीसीआयने दिलीये ही सूट
IND vs ZIM: दुसरा सामना जिंकूनही शुभमन गिलची डोकेदुखी वाढली! समोर आलं मोठं कारण

तसेच एक्स्प्रेस स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर त्याला कोचिंग स्टाफ निवडण्याची अनुमती दिली जाणार आहे. मात्र फलंदाजी प्रशिक्षक असेल की नाही हे समजू शकलेलं नाही. कारण गौतम गंभीर हा स्वतः एक उत्तम फलंदाज आहे. त्यामुळे तो स्वतः फलंदाजी प्रशिक्षण देऊ शकतो.

Team India Head Coach: गौतम गंभीरच होणार टीम इंडियाचा हेड कोच?बीसीसीआयने दिलीये ही सूट
IND vs ZIM: 6,6,6,6,6..झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू सिंगचा कहर! मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीला सोडू शकतो मागे

यापूर्वी राहुल द्रविड यांचा मुख्यप्रशिक्षकपदाचा कार्यकाळ २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेवेळी संपला होता. मात्र रोहितच्या म्हणण्यावर राहुल द्रविड यांना थांबवण्यात आलं होतं. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com