Rahul Dravid: टीम इंडियाला कोचिंग दिल्यानंतर या 3 संघांची राहुल द्रविडवर नजर; मिळू शकते मोठी ऑफर

Rahul Dravid Coaching: राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे.
Rahul Dravid: टीम इंडियाला कोचिंग दिल्यानंतर या 3 संघांची राहुल द्रविडवर नजर; मिळू शकते मोठी ऑफर
rahul dravidtwitter

आयसीसी टी -२० वर्ल्डकप जिंकताच भारतीय संघाने ११ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. या स्पर्धेसह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला आहे. त्यांचा कार्यकाळ हा वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर संपला होता. मात्र त्यांना थांबवण्यात आलं. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांना एकदाही वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकता आली नाही. मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसीची ट्रॉफी उंचावली आहे. दरम्यान आता आयपीएल स्पर्धेत राहुल द्रविडवर सर्व संघाची नजर असणार आहे.

राहुल द्रविड यांना प्रशिक्षण देण्याचा दांडगा अनुभव आहे. आता त्यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. यापूर्वी त्यांनी राजस्थान रॉयल्स संघासाठी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या स्पर्धेसाठी फ्रँचाचझींनी कंबर कसली आहे. रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने दिनेश कार्तिकची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. तर राजस्थान रॉयल्स राहुल द्रविडला आपल्या संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यासाठी पूर्ण ज लावताना दिसून येऊ शकतो. तर दिल्ली कॅपिटल्स संघालाही २०२४ मध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे दिल्लीचा संघ राहुल द्रविड यांना विचारणा करु शकतो.

Rahul Dravid: टीम इंडियाला कोचिंग दिल्यानंतर या 3 संघांची राहुल द्रविडवर नजर; मिळू शकते मोठी ऑफर
IND-W vs SA-W: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! दक्षिण आफ्रिकेला 10 विकेट्सने लोळवलं

राहुल यांनी आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना केली होती. त्यांना या संघाचं नेतृ्त्व करण्याची संधीही मिळाली. आता भारतीय संघाला आयसीसीची ट्रॉफी जिंकून देणाऱ्या राहुल द्रविड यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर दिली जाऊ शकते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला आतापर्यंत आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ च्या सेमिफायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर वनडे वर्ल्डकप २०२३ च्या फायनलमध्ये, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आणि टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या फायनलमध्ये विजय मिळवला आहे.

Rahul Dravid: टीम इंडियाला कोचिंग दिल्यानंतर या 3 संघांची राहुल द्रविडवर नजर; मिळू शकते मोठी ऑफर
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com