भारतीय क्रिकेट संघाने १४० कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. गेल्या ११ वर्षांपासून भारतीय संघ आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याच्या प्रतीक्षेत होता. मात्र सेमिफानयल आणि फायनलमध्ये येऊन भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागत होता. मात्र यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने शेवटच्या सामन्यापर्यंत शानदार खेळ केला आणि भारतीय संघाला दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून दिली.
या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र ही स्पर्धा राहुल द्रविडसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेसह त्यांचा मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळही संपला आहे. दरम्यान हे पद सोडल्यानंतर राहुल द्रविड यांनी रोहितचा उल्लेख करत त्याचे आभार मानले आहेत.
राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर संपला होता. मात्र त्यांना रोहितने थांबवून घेतलं. हा किस्सा स्वत: राहुल द्रविडने शेअर केला आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये राहुल द्रविड म्हणाले की,' थँक यू रो.. नोव्हेंबरमध्ये मला तो कॉल केल्यामुळे आणि थांबवून घेतल्यामुळे. मला वाटतं की, भारतीय संघातील खेळाडूंसह काम करणं ही अभिमानाची बाब आहे. मी सर्वांचे आभार मानतो. मात्र एक कर्णधार म्हणून तुझा वेळ दिल्याबद्दल रोहित तुझे खूप आभार. आपण अनेकदा चर्चा केली. आपण कित्येक विषयांवर बोललो. अनेकदा आपले विचार जुळले, तर काही वेळेस विचार नाही जुळले. असं असलं तरी तुझे खूप आभार. या ग्रुपमध्ये प्रत्येक खेळाडूला जाणून घेणं हे शानदार होतं.' राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर संपला होता. मात्र रोहितने त्यांना टी-२० वर्ल्डकपपर्यंत थांबण्याची विनंती केली होती.
राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेट इतिहासातील एक दिग्गज खेळाडू आहेत. एक खेळाडू म्हणून त्यांना भारतीय संघासाठी वर्ल्डकप जिंकता आला नाही. मात्र मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी हे करुन दाखवलं आहे. भारतीय संघाने वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केला. त्यानंतर राहुल द्रविडने केलेलं सेलिब्रेशन हे चर्चेचा विषय ठरला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.