Marathi Song Out: ‘आली आली गं भागाबाई’चं ढिंच्याक व्हर्जन; ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटातील मल्टीस्टारर गाण्याची सोशल मीडियावर धूम

Ekda Yeun Tar Bagha Movie Song: ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.
Aali Ga Bhaagabai Song Out
Aali Ga Bhaagabai Song OutSaam TV
Published On

Aali Ga Bhaagabai Marathi Song Out:

चित्रपट आणि चित्रपटातील गाणी हे एक वेगळं समीकरण आहे. अनेक चित्रपट त्यांच्या गाण्यांमुळे आजही प्रेक्षकांच्या हृदयात जिवंत आहेत. 'आशिकी' चित्रपट त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. सध्याच्या चित्रपटामध्ये एक ववगळा ट्रेंड पाहायला मिळत आहे. आता चित्रपटात जुनी गाणी नव्या पद्धतीने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे एक जुन्या गाण्याचे नवीन व्हर्जन आहे. जुन्या गाण्याप्रमाणे नवीन गाणे देखील हिट होत असल्याचे दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटातील ‘आली आली गं भागाबाई’ हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे पारंपरिक गाणं या चित्रपटामध्ये अगदी नवीन रंगात आणि ढंगात प्रेक्षकांसमोर आणलं आहे. 'आली आली गं भागाबाई' या नवीन प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. लवकरच हे गाणे १ मिलियनचा आकडा पार करेल.

‘आली आली गं भागाबाई’ हे गं रोहन प्रधान यांनी गायलं आहे. मंदार चोळकरने हे गाणे लिहिलं आहे. रोहन-रोहन या जोडीने ‘आली आली गं भागाबाई’ला संगीत दिलं आहे.  या गाण्यात चित्रपटातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाज पाहायला मिळत आहे.

या गाण्यात तुम्हाला या चित्रपटाची कथा लक्षात येईल. ‘आली आली गं भागाबाई’ गाण्यात चित्रपटामध्ये काहीतरी गडबड झाल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच गाण्यातील पात्रांना ते पुरते अडकल्याचे लक्षात आले आहे. गाण्यातून कलाकारानं त्यांच्या अवस्था आणि परिस्थिती सांगत आहेत. (Latest Entertainment News)

Aali Ga Bhaagabai Song Out
Jethalal In Trouble: आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याने जेठालाल अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?

२४ नोव्हेंबरला 'एकदा येऊन तर बघा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसादखांडेकर, राजेंद्र शिसातकर,  नम्रतासंभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार अशी भली मोठी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. या चित्रपटाचे लेखन देखील अभिनेता प्रसाद खांडेकरने केले आहे. (Celebrity)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com