Petrol Diesel Rate Today: राज्यात आज एका लिटर पेट्रोल डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा एका क्लिकवर

Petrol Diesel Rate 11 July 2024: राज्यात मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा फरक पडलेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.
Petrol Diesel Price News Today
Petrol Diesel Rate Saam tv
Published On

देशभरात रोज पेट्रोल डिझेलचे नवे भाव अपडेट होत असतात. आज पेट्रोल डिझेलचे नवे भाव जाहीर झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून कोणताही बदल झालेला नाही. परंतु सीएनजीचे भाव १.५० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.

इंधन कंपन्या देशातील पेट्रोल डिझेलचे भाव ठरवतात. हे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. WTI क्रूड ऑइल ८३.१६ डॉलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ८६.५४ डॉलरवर विकले जात आहे. जाणून घेऊया देशातील पेट्रोल डिझेलचे भाव.

Petrol Diesel Price News Today
Moto G85 5G : 24 GB RAM, 32MP सेल्फी कॅमेरा; Motorola चा जबरदस्त फिचर्स असलेला आणि स्वस्त फोन लॉन्च, कधीपासून होणार उपलब्ध?

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे.चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Price News Today
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात भरघोस वाढ

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. पुण्यात पेट्रोलचे भाव १०४.१३ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.६५ रुपये आहे.ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.५१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.८८ रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.२६ रुपये झाली आहे. काल नागपूरात पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये होती. तर डिझेलची किंमत ९०.८१ रुपये प्रति लिटर आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.५६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.०८ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४७ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.९९ रुपये आहे.

Petrol Diesel Price News Today
Gold Silver Rate [10 July]: सोन्यासह चांदीचा भाव कोसळला; वाचा मुंबई-पुण्यासह अन्य शहरांतील आजच्या किंमती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com