DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात भरघोस वाढ

Maharashtra Govt Approves DA Hike: महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलंय. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ केलीय.
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात भरघोस वाढ
Maharashtra Govt Approves DA Hike:Business Standard
Published On

गणेश कावडे, साम प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिलीय. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तात भरघोस वाढ केलीय. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आलीय.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठं गिफ्ट शिंदे सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलाय. सरकारने काही दिवसांपूर्वीच ऊर्जा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली होती.

आता राज्य शासनातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात थेट ४ टक्क्यांची वाढ करण्यात आलीय. त्यामुळे राज्य सरकारमधील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान महागाई भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना होणार लागू

या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी मोठा निर्णय घेतला होता. हा निर्णय म्हणजे, महाराष्ट्र राज्य सरकारने सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना मान्य केली होती. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सरकारने जाहिरात दिलेल्या आणि त्यावेळी निवड केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे. याबाबत शासन निर्णयही जाहीर करण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com