मोबाइलची सुरक्षा (Mobile Security) असो किंवा सोशल मीडिया अकाउंट्स (Social Media Accounts) यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड (Passwords) वापरले जातात. पण तुमच्या काही चुकांमुळे तुमचा पासवर्ड लीक झाला तर? किंवा तुमच्या सवयींमुळे कोणीतरी तुमच्या पासवर्ड जाणून घेतला तर?
2022 साठीचा Weak Password Report आला आहे. या अहवालात लोकांच्या पासवर्ड ठेवण्याच्या पद्धतींबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सोशल मीडिया अकाउंट्सपासून ऑफिसच्या मेलपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी लोक पासवर्ड ठेवतात. त्यामुळे काही वेळा हे पासवर्ड काही दिवसांनी अपडेट करायला हवे.
अहवाल काय म्हणतो?
स्वीडिश पासवर्ड मॅनेजमेंट आणि ऑथेंटिकेशन सोल्यूशन विक्रेता स्पेकॉप्स सॉफ्टवेअरच्या (Specops Software) ताज्या अहवालानुसार, ब्रूट फोर्स (Type Of Hacking) मध्ये वापरलेले 93 टक्के पासवर्ड 8 किंवा त्याहून अधिक शब्दांचे असतात. त्याच वेळी, 54% संस्थांकडे कामाचे पासवर्ड मॅनेज करण्यासाठी कोणतेही टूल नसते. अहवालानुसार, 42 टक्के पासवर्डमध्ये Summer हा शब्द आढळला आहे.
Brute Force Attack, Shoulder Surfing आणि Social Engineering या काही हॅकिंग पद्धती आहेत, ज्यांच्या मदतीने सायबर हल्ला किंवा पासवर्ड हॅक केले जातात. अशा प्रकारे हॅकर्स तुमचा पासवर्ड शोधतात.
या आहेत हॅकिंग पद्धती;
-Brute Force Attack: ब्रूट फोर्स अटॅकमध्ये हॅकर्स युजर्सच्या पासवर्डचा अंदाज घेतात. यामध्ये, स्कॅमर हॅकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने काही कॉम्बिनेशन्स वापरून वापरकर्त्यांचे पासवर्ड क्रॅक करण्याचा प्रयत्न करतात.
-Social Engineering: सोशल इंजीनियरिंगपण एक हॅकिंगचा प्रकार आहे. यामध्ये हॅकर्स खोटी सोशल इंजीनियरिंग वेबसाईट बनवतात. ज्यामध्ये युजर्स आपले क्रेडेन्शियल्स टाकतो आणि हॅकर त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतो. याप्रकारचे वेबपेज दिसायला तर एकदम खरे वाटतात पण ते तुम्हाला यामार्फतच जाळ्यात अडकवतात.
-Credential Stuffing: क्रेडेन्शियल स्टफिंग ही देखील हॅकिंगची एक पद्धत आहे. ज्यामध्ये हॅकर्स स्पायवेअर आणि मालवेअरद्वारे वापरकर्त्याची क्रेडेंशियल्स चोरतात. डार्क वेबवर लीक झालेल्या पासवर्डच्या अनेक याद्या आहेत आणि सायबर गुन्हेगार त्यांचा हॅकिंगसाठी वापर करतात.
-Keylogger Attack: या प्रकारच्या हल्ल्यात स्पायवेअरच्या मदतीने हॅकर्स तुमचे कीबोर्ड टायपिंग ट्रॅक करून रेकॉर्ड करतात. हे हॅकिंग टाळण्यासाठी, तुमच्या फोनमध्ये अँटीव्हायरस असणे आवश्यक आहे.
Password Spray Attack: जेव्हा हॅकर चोरी केलेले लाखो पासवर्ड काही खात्यात वापरतो, तेव्हा त्याला पासवर्ड स्प्रे अटॅक म्हणतात. यामुळे तुम्ही ठराविक काळाने तुमचे पासवर्ड बदलत राहिले पाहिजेत.
Shoulder Surfing: तुम्ही अनेक वेळा काही लोकांना इतरांच्या फोनमध्ये डोकावताना पाहिले असेल. हॅकर्स अनेकदा अशाच प्रकारे पासवर्डची चोरी करतात. या प्रकारात एटीएम पिन चोरीच्या घटना गणल्या जातात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.