8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना मिळेल १८ लाख एरियर; कसं ते वाचा...

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगानुसार लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांना तब्बल १८ लाख रुपये एरियर मिळण्याची शक्यता आहे.
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना मिळेल १८ लाख एरियर; कसं ते वाचा...
8th Pay Commission Big Update meta ai
Published On
  • आठवा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

  • लेव्हल 8 च्या कर्मचाऱ्यांना जबदस्त एरियर मिळणार

  • आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टरनुसार एरियरची गणना केली जाते

  • लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना मिळेल १८ लाख एरियर मिळण्याची शक्यता

आठव्या वेतन आयोगासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आठवा वेतन आयोग १ जानेारी २०२६ पासून लागू झाला. जर आठवा वेतन आयोगाचा अहवाल लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या थकबाकीचा मोठा हिस्सा मिळणार आहे. देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या आयोगाच्या बैठकांमध्ये हा मुद्दा जोरदारपण उपस्थित करण्यात आला आहे.

आठव्या वेतन आयोगाची पुढची बैठक येत्या ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे होणार आहे. याआधी आठव्या वेतन आयोगाने चेन्नई, पदुचेरी, कोलकाता, लखनऊ, भुवनेश्वर, दिल्ली यासारख्या शहरांमध्ये बैठका झाल्या आहेत. आठव्या वेतन आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर सरकारकडून एक अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या थकबाकीबाबत निर्णय देखील घेतला जाईल. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या गणनेनुसार पगार आणि निवृत्तीवेतन मिळत आहे.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना मिळेल १८ लाख एरियर; कसं ते वाचा...
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना जॅकपॉट लागण्याची शक्यता! ३.२५ फिटमेंट फॅक्टरची मागणी; Level-10 मुळे पगार किती वाढणार?

आठव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्याच्या पगारात किती वाढ होईल हे मोजण्यासाठी फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा आहे. कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांनी फिटमेंट फॅक्टरबाबत वेगवेगळ्या मागण्या आतापर्यंत केल्या आहेत. आयोग २.१५, २.२८ किंवा २.५७ असा फिटमेंट फॅक्टर निश्चित करू शकतो. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे कर्मचाऱ्यांना किती एरियर म्हणजे थकबाकी मिळेल याची चर्चा सध्या सुरू आहे.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना मिळेल १८ लाख एरियर; कसं ते वाचा...
8th Pay Commission: गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा

आठव्या वेतन आयोगाकडे १८ महिन्यांची मुदत आहे. आयोगाची अधिसूचना नोव्हेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आली होती. त्यामुळे आयोगाचा कार्यकाळ मे २०२७ मध्ये संपेल. थकबाकीची रक्कम आठव्या वेतन आयोगामुळे होणारा विलंब आणि फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे. जर आयोगाने २.१ फिटमेंट फॅक्टर वापरला आणि अहवालाची अंमलबजावणी १८ महिन्यांच्या विलंबाने झाली तर लेव्हल ६ च्या कर्मचाऱ्यांना ७ लाख रुपयांची थकबाकी मिळू शकते. २.२८ फिटमेंट फॅक्टरवर लेव्हल ६ च्या कर्मचाऱ्यांना १,०८७,४८८ रुपयांची थकबाकी मिळू शकते.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना मिळेल १८ लाख एरियर; कसं ते वाचा...
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! १८ हजारांचा बेसिक पगार थेट ६९ हजार रुपये होणार? बेसिक सॅलरीचे 'हे' गणित पाहाच

२.५७ फिटमेंट फॅक्टरवर १,३३३,८७२ रुपयांची थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. जर आयोगाने २.१५ चा फिटमेंट फॅक्टर वापरल्यास लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना१८ महिन्यांच्या कालावधीसाठी १,३१३,७६० ची थकबाकी मिळेल. २.२८ च्या फिटमेंट फॅक्टरनुसार लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना १,४६२,२७२ ची थकबाकी मिळेल.तर २.५७ च्या फिटमेंट फॅक्टरनुसार १,७९३,५६८ ची थकबाकी मिळेल.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, लेव्हल ८ च्या कर्मचाऱ्यांना मिळेल १८ लाख एरियर; कसं ते वाचा...
8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com