

होळीपूर्वी देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मोठी भेट देऊ (Govt Employees Salery) शकते. केंद्र सरकार होळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे. ही वाढ 4 टक्क्यांनी होऊ शकते. (marathi news)
केंद्र सरकारच्या औद्योगिक कामगारांसाठीचा महागाई भत्ता CPI डेटाच्या आधारे ठरवला जातो. सध्या CPI डेटाची 12 महिन्यांची सरासरी 392.83 आहे. या आधारे, डीए मूळ वेतनाच्या 50.26 टक्के असेल. कामगार मंत्रालयाचा लेबर ब्युरो विभाग दर महिन्याला CPI-IW डेटा प्रकाशित करतो.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
सरकारच्या या निर्णयाचा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही मोठा फायदा होणार आहे. सरकार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार (7th Pay Commission) आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सरकारकडून महागाई भत्त्यासोबतच पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत वाढ केली जाते.
दरवर्षी, DA आणि DR सहसा जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा वाढवले जातात. शेवटची वाढ ऑक्टोबर 2023 मध्ये झाली होती. तेव्हा डीए 4 टक्क्यांनी वाढवून 46 टक्के करण्यात आला होता. सध्या डीएमध्ये 4 टक्के वाढ होण्याची शक्यता (4 Percent DA Hike Update) आहे. मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा झाली, तर त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांनाही मागील महिन्यांची थकबाकी मिळणार आहे.
पगार किती वाढणार
महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत 4 टक्के वाढ (Govt Employees DA Hike Update) झाली, तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात किती वाढ होईल, हे उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन दरमहा 53,500 रुपये असेल. अशा स्थितीत 46 टक्क्यांनुसार सध्याचा महागाई भत्ता 24,610 रुपये असेल. आता डीए 50 टक्के वाढल्यास ही रक्कम 26,750 रुपये होईल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा पगार 26,750 रुपये 24,610 = 2,140 रुपये प्रति महिना वाढेल. केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना दरमहा 41,100 रुपये मूळ पेन्शन (Govt Employees Salery Hike) मिळते. 46 टक्के डीआर दराने पेन्शन मिळवणाऱ्यांना 18,906 रुपये मिळतात. जर त्यांचा डीआर 50 टक्के झाला, तर त्यांना महागाईपासून दिलासा म्हणून दरमहा 20,550 रुपये मिळतील. अशा परिस्थितीत, जर डीएमध्ये 4 टक्के वाढ झाली, तर त्यांची पेन्शन दरमहा 1,644 रुपयांनी वाढेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.