Salary Hike Expectations : नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना किती पगारवाढ अपेक्षित असते? अहवालातून समोर आली महत्वाची माहिती

Salary Hike Expectations After job switch : नोकरी बदलू इच्छिणारे व्यक्ती पगारवाढीलाच आकर्षित होतात. पगारवाढ देऊ इच्छिणारी कंपनीकडे मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग आकर्षित होतो. नोकरदारांच्या पगारवाढीविषयीची अपेक्षांची माहिती एक स्टाफिंग फर्म एडेकोच्या सर्व्हेतून समोर आली आहे
Salary Hike
Salary HikeSaam Tv
Published On

Salary Hike Expectations After job switch :

नोकरी बदलू इच्छिणारे व्यक्ती पगारवाढीलाच आकर्षित होतात. पगारवाढ देऊ इच्छिणारी कंपनीकडे मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग आकर्षित होतो. नोकरदारांच्या पगारवाढीविषयीची अपेक्षांची माहिती एक स्टाफिंग फर्म एडेकोच्या सर्व्हेतून समोर आली आहे. स्टाफिंग फर्म एडेकोच्या सर्व्हेत २१ टक्के भारतीय कर्मचारी आणि ९ टक्के मलेशियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये २० टक्क्यांहून अधिक पगारवाढ झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. (Latest Marathi News)

'एडेको इंडिया सॅलरी गाइड 2024'च्या रिपोर्टनुसार, भारत आणि मलेशियातील अनुक्रमे ९१ टक्के आणि ७२ टक्के कर्मचारी नोकरी बदलताना त्यांना २० टक्के पगारवाढ अपेक्षित असते. भारतातील ५० टक्के कर्मचाऱ्यांची पॅकेजविषयी तक्रार नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Salary Hike
Samsung 5 G: स्वस्त झाला सर्वाधिक विक्री होणारा Samsungचा 5G फोन; 'या' वेळेपर्यंत घेता येणार ऑफरचा लाभ

२९.५ टक्के कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, आम्हाला मिळणारा मासिक पगार हा इंडस्ट्रीच्या सरासरीनुसार कमी आहे. त्यामुळे नोकरी बदलू इच्छित आहे. तर १४.८३ टक्के कर्मचाऱ्यांना इंडस्ट्रीच्या सरासरीनुसार अधिक पगार हवा आहे.

परफॉर्मन्स अप्रेजलविषयी बोलायचं झालं तर, सर्व्हेनुसार ५२.५ टक्के कर्मचाऱ्यांची ५ ते १० टक्के पगारवाढ झाली आहे. तर १५ टक्के कर्मचाऱ्यांची २० टक्के पगारवाढ झाली आहे. एडेक्को इंडिया सॅलरी गाइड जानेवारी २०२४ रिपोर्टमध्ये विविध क्षेत्रातील कर्मचारी आणि मालकाच्या अनुषंगाने सर्व्हेवर आधारित करण्यात आला आहे.

Salary Hike
Credit Card: क्रेडिट कार्डचं लिमिट वाढवायचं आहे? 'या' टिप्स फॉलो करा

कर्मचाऱ्यांचं प्राधान्य कशाला?

तत्पूर्वी, बिझनेस टुडेनुसार, मेटा आणि सेल्‍सफोर्स सारख्या मोठ्या कंपनीमधील कर्मचारी त्यांचं प्राधान्य बदलू लागले आहेत. सॅलरी पॅकेजमधील कर्मचारी आता दुसऱ्या बाबींकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. आता हे कर्मचारी वर्क कल्‍चर, करिअर ग्रोथ, वर्क-लाइफ बॅलेंस याचा विचार करताना दिसत आहे. नोकरीच्या स्थिरतेचाही विचार करू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com