Salary Increment: यंदा पगारात किती वाढ होणार? सर्वेक्षण अहवालातून माहिती आली समोर

Salary Increment 2024: सर्वांना आपल्या पगारात वाढ व्हावी, असं वाटत असतं. प्रत्येकजण त्यासाठी प्रयत्न देखील करत असतो. यंदा पगारात किती वाढ होणार? हे आपण जाणून घेऊ या.
Salary Increment
Salary IncrementSaam Tv
Published On

Average Salary Hike 2024

सर्व भारतीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर प्रत्येकजण पैशांसाठी काम करतो, आपल्याला अधिक पैसे कसे मिळणार याचा विचार करत असतो. यासंदर्भातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कारण यावर्षी तुमच्या पगारात मोठी वाढ (Salary Increment) होणार आहे. आता पगार नक्की किती टक्क्यांनी वाढू शकतो, हे आपण जाणून घेऊ या. (latets business news)

यावर्षी भारतीय कर्मचाऱ्यांचा पगार सरासरी 9.5 टक्क्यांनी वाढू शकतो. ह्युमन रिसोर्स फर्म एऑनने नुकतंच एक सर्वेक्षण केलं होतं. त्यामध्ये ही आकडेवारी समोर आली (Salary Increment Report) आहे. या सर्वेक्षणात भारतातील लोकांच्या सरासरी पगारात 9.5 टक्क्यांनी वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे. 2023 मध्ये 9.7 टक्क्यांनी वाढ (Salary Hike) झाली होती. त्यापेक्षा ही आकडेवारी कमी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पगारात किती वाढ होणार

एऑनने आपल्या सर्वेक्षण अहवालात सांगितलं आहे की, 2024 मध्ये प्रत्येक चारपैकी तीन कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा पगारात 9 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होईल. कंपन्यांच्या वार्षिक वेतन वाढ आणि उलाढाल सर्वेक्षण 2023-24 नुसार, उत्पादन क्षेत्र आपल्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त पगारवाढ देणार (Salary Increment 2024) आहे. ही कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

या वर्षी उत्पादन क्षेत्रात सुमारे 10.1 टक्क्यांनी पगारवाढ होऊ शकतो. टेक पॅकमध्ये, उत्पादन कंपन्या 9.5 टक्के वेतनवाढ देऊ शकतात, तर सेवा कंपन्या 8.2 टक्के वेतन वाढ देऊ शकतात, असा अंदाज एऑनने आपल्या सर्वेक्षण अहवालात वर्तविला (Average Salary Hike) आहे. परंतु मागील वर्षातील वेतनवाढ यावर्षीपेक्षा जास्त होती.

Salary Increment
UPI Payment: परदेशात फिरण्यासाठी डॉलर घ्यायची गरज नाही; या देशांमध्ये UPI द्वारे करु शकणार पेमेंट

कर्मचाऱ्यांच्या सरासरी वेतनात घट

एऑनने आपल्या सर्वेक्षण अहवालात म्हटलंय की, जुन्या आयटी सेवा कंपन्यांपेक्षा स्टार्टअप कंपन्या देखील चांगले पैसे देऊ शकतात. त्या सरासरी 8.5 टक्के वेतनवाढ देतील. 2023 मध्ये हा दर 9 टक्के होता. बहुराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांचे वेतन 9.8 टक्क्यांनी वाढू शकतात. वित्तीय संस्थांमध्ये सर्वाधिक म्हणजे 9.9 टक्के पगारवाढीचा अंदाज (Average Salary Hike 2024) आहे.

एऑनच्या अलीकडील अभ्यासात असं दिसून आलं आहे की, 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या सरासरी वेतनात (Salary) 18.7 टक्क्यांनी घट झाली होती, तर 2021 आणि 2022 मध्ये ती 21 टक्क्यांपेक्षा जास्त होती.

Salary Increment
Salary Hike Expectations : नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना किती पगारवाढ अपेक्षित असते? अहवालातून समोर आली महत्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com