Salary Hike: 'या' मोठ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, 1 नोव्हेंबरपासून वाढणार पगार
Infosys Employees Salary Hike:
देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, ते 1 नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार आहेत.
टाऊन हॉलच्या बैठकीत कंपनीचे मुख्य एचआर अधिकारी शाजी मॅथ्यू यांनी ही बातमी शेअर केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वार्षिक पगारवाढ पुढे ढकलल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, इन्फोसिसमध्ये वरिष्ठ व्यवस्थापनाखालील कर्मचाऱ्यांना एप्रिलमध्ये वार्षिक पगारवाढ देण्याची प्रथा आहे. कंपन्यांमधील इतर लोकांचे पगार जुलैमध्ये वाढतात. उद्योगातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या बिझनेस ऑप्टिमायझेशनमुळे यावर्षी कंपनीने पगारवाढ पुढे ढकलली होती. (Latest Marathi News)
अर्निंग अहवालानंतर, गुंतवणूकदारांच्या कॉल दरम्यान इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय म्हणाले की, पगारवाढीला विलंब करण्याचा निर्णय कंपनीमधील Insufficiency दूर करण्यासाठी घेण्यात आला होता. ते म्हणाले की, या पावलांमुळे कंपनीच्या मार्जिनमध्ये 50 बेसिस पॉईंट्सने सुधारणा झाली आहे.
नफा 3 टक्क्यांनी वाढून 6212 कोटी रुपये झाला
दरम्यन, Infosys ने गुरुवार, 12 ऑक्टोबर 2023 रोजी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने सांगितले की दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 3 टक्क्यांनी वाढून 6,212 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल 7 टक्क्यांनी वाढून 38,994 कोटी रुपये झाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.