आठवड्याच्या पहिल्या दिवसाची म्हणजेच सोमवारची सुरुवात शेअर बाजारात मोठ्या घसरणीने झाली. व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स 895 अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 19,300 अंकांच्या खाली घसरला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 825.74 अंकांनी घसरून 64,571.88 वर बंद झाला.
त्याचप्रमाणे निफ्टी 260.90 अंकांनी घसरून 19,281.75 वर पोहोचला. बाजारातील या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 7.56 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. BSE चे मार्केट कॅप 311.12 लाख कोटी रुपयांवर घसरले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
काय आहे घसरणीचं कारण?
अमेरिकन सरकारचे बेंचमार्क बाँडचे उत्पन्न 5 टक्क्यांवर पोहोचले आहे. जवळपास 15 वर्षांनंतर बाँडचे उत्पन्न या पातळीवर आले आहे. यापूर्वी 2007 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकन ट्रेझरी उत्पन्नामुळे इतर गुंतवणुकीसाठी अपेक्षित परतावा वाढतो, मग ते इक्विटी, रिअल इस्टेट किंवा बाँड्स असो. (Latest Marathi News)
याशिवाय महागाईमुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलीकडेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी महागाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. अशा स्थितीत फेडरल रिझर्व्ह पुन्हा एकदा व्याजदर वाढवू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उद्या शेअर बाजार बंद
दरम्यान, उद्या म्हणजेच मंगळवारी दसरा असल्याने शेअर बाजार बंद राहणार आहे. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीसह इतर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. ऑक्टोबरमधील हा दुसरा दिवस आहे, जेव्हा कोणत्या सण किंवा सरकारी सुट्टीमुळे बाजार बंद राहील. यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद ठेवण्यात आला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.