Liquor Price Hike: मद्यप्रेमींना झटका! सरकारच्या निर्णयामुळे दारुच्या किंमतीत मोठी वाढ

VAT On Liquor In Maharashtra: राज्य सरकारने परमिट रुम सर्व्हिसवर १ नोव्हेंबरपासून ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.
Liquor VAT
Liquor VATSaam TV
Published On

VAT On Liquor:

मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीये. महाराष्ट्रातील बार, लाउंज आणि कॅफेमध्ये दिलं जाणारं मद्य महागणार आहे. त्यामुळे येथे बसून मद्य पिणाऱ्या व्यक्तींना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. १ नोव्हेंबरपासून राज्यात दारू महागणार असून राज्य सरकारने VAT मध्ये ५ टक्क्यांनी वाढ केलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Liquor VAT
Goa Liquor : नूडल्सच्या नावावर दारुची तस्करी; कराडात Excise चा छापा; साठ लाखांच्या बाटल्या जप्त

राज्य सरकारने परमिट रुम सर्व्हिसवर १ नोव्हेंबरपासून ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या आधी ५ टक्के व्हॅट आकारला जात होता. त्यात आणखी ५ टक्के वाढ केल्याने परमिट रुमवर एकूण १० टक्के व्हॅट दर आकारला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारनं परवाना शुल्कातील दरांत वाढ केली. त्यामुळे मद्यावरील दरही वाढला. अशात आता पुन्हा एकदा बार, लाउंज आणि कॅफेमधील दर वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

पंचतारांकीत हॉटेलमध्ये अधिकचा कोणताही व्हॅट आकारण्यात येणार नाही. कारण अशा हॉटेल्समध्ये आधिपासूनच २० टक्के व्हॅट आकारला जातोय. त्यामुळे पंचतारांकीत हॉटेल्सच्या दरांत यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासह ओ्व्हर- द-काउंटरवर देखील वाढीव व्हॅट आकारण्यात येणार नाहीये.

Liquor VAT
Wardha Crime News : पेट्रोलपंप लूट प्रकरणी हिंगणघाटात तिघांना अटक, एकाचा शाेध सुरु

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com