RPF Salary: आरपीएफ जवानांना किती पगार मिळतो? रेल्वेच्या या दलात नोकरी कशी मिळवता येईल?

RPF Salary: आरपीएफ जवानांच्या पगार आणि कामाविषयी जाणून घेऊयात.
RPF Salary
RPF SalarySaam tv
Published On

RPF Salary: रेल्वे सुरक्षा दल हे एक सशस्त्र दल आहे. रेल्वे सुरक्षा दल हे रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. आरपीएफ जवान रेल्वेच्या संपत्तीचं संरक्षण करतात. आरपीएफ जवानांची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या आरपीएफ जवानांच्या पगार आणि कामाविषयी जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

आरपीएफ जवानांना चांगला पगार मिळतो. आरपीएफ जवानांना ७ व्या वेतन आयोगानुसार, पगार मिळतो. आरपीएफ कॉन्स्टेबलला महिन्याला २७,९०२ रुपये ते ३१,३७० रुपये मासिकदरम्यान पगार मिळतो. (RPF Salary)

RPF Salary
DSP Salary in Maharashtra: पोलिस उपअधीक्षक झाल्यानंतर किती मिळतो पगार, कोणत्या मिळतात सुविधा? जाणून घ्या...

आरपीएफ जवानांचा पगार आणि सुविधा

आरपीएफ जवानांना ७ व्या वेतन (Salary) आयोगानुसार पगार मिळतो. तसेच अनेक सुविधाही त्यांना मिळतात. आरपीएफ जवानांना घर भाडे भत्ता, वाहतूक भत्ता, नाईट ड्युटी भत्ता, जादा वेळ भत्ता, ग्रॅच्युटी इत्यादी सुविधा मिळतात. यासह इतरही सुविधा आरपीएफ जवानांना मिळतात.

आरपीएफमध्ये (RPF) कॉन्स्टेबल पद मिळविण्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून १० वी पास शिक्षण हवंय. आरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवार हा १८ वर्ष ते २५ वर्ष वयाच्या दरम्यान असावेत. आरपीएफ कॉन्स्टेबल पद मिळल्यानंतर काही वर्षांनी बढतीही मिळते.

RPF Salary
Commentators Salary: समालोचक एका सामन्याचे किती पैसे घेतात? पाहा टॉप -५ प्रसिद्ध समालोचकांची यादी...

आरपीएफ कॉन्स्टेबल काय काम करतात?

आरपीएफ कॉन्स्टेबल हे रेल्वे संपत्ती आणि प्रवाशांना सुरक्षा पुरवतात. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आरपीएफ कॉन्स्टेबल जवानांचं असतं. तसेच रेल्वे स्टेशन परिसरातही शांतता राखण्याचं काम आरपीएफ कॉन्स्टेबल जवानांचं असतं. रेल्वे प्रवासी गुन्हा करताना दिसल्यास त्याच्यावर कारवाई करणे. रेल्वे स्टेशनवर नियमित गस्त घालणे, असे विविध कामे आरपीएफ कॉन्स्टेबल जवानांचं असतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com