Union Budget 2025: १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, किती उत्पन्नांवर किती कर? जाणून घ्या
Budget 2025 tax reliefSaam TV

Union Budget 2025: १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, किती उत्पन्नांवर किती कर? जाणून घ्या

Budget 2025 Tax Relief: १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर लागणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन करप्रणाली कशी असणार आहे ते घ्या जाणून...
Published on

केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर लागणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या करप्रणालीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणाली देखील जाहीर केली आहे. स्टँडड डिडक्शन ५० हजारांवरून ७५ हजार रुपये करण्यात आले आहे. सरकार पुढील आठवड्यामध्ये नवं विधेयक आणणार आहे.

नोकरदारवर्गासाठी अर्थमंत्र्यांनी आज मोठी घोषणा केली. १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. नव्या कररचनेअंतर्गत १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.

महिन्याला १ लाख उत्पन्न असणाऱ्यांना यापुढे कुठलाही कर लागणार नाही. तर १८ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ७० हजारांची सूट मिळणार आहे. २५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १ लाख २० हजारांची सूट मिळणार आहे. नवीन कर प्रणाली कशी आहे हे जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचे आहे.

नवीन कर प्रणाली कशी आहे -

०-४ लाख - ० टक्के

४-८ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर - ५ टक्के

८ ते १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर- १० टक्के

१२ ते १६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर - १५ टक्के

१६ ते २० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर - २० टक्के

२० ते २४ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर - २५ टक्के

२४ लाखांच्या वरील उत्पन्नावर - ३० टक्के

Union Budget 2025: १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, किती उत्पन्नांवर किती कर? जाणून घ्या
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन इतिहास रचणार, आज सादर करणार आठवा अर्थसंकल्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com