Nirmala Sitharaman: फरार नीरव मोदी, विजय मल्ल्याकडून हजारो कोटींची वसूली, लोकसभेत अर्थमंत्र्यांनी थेट आकडेवारीच सांगितली

Vijay Mallya and Neerav Modi assets restored to banks: 'फरार उद्योगपती देश सोडून गेले असले तरीही, आम्ही त्यांच्या मागे आहोत. ईडीने हे पैसे जमा करून बँकांना परत दिले आहेत'. - निर्मला सीतारमण
nirmala sitharaman on vijay mallya
Nirmala SitharamanSaam Tv
Published On

बँकांकडून कर्ज घेऊन देश सोडून पळ काढणाऱ्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांसारख्या उद्योगपतींवर सरकारने कठोर कारवाईची पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. आतापर्यंत फरार उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्ता विकून सरकारने हजार कोटी रूपये वसूल केले असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत सांगितलं.

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी पुरवणी मागण्यांची चर्चा लोकसभेत सुरू असताना सीतारमण यांनी सांगितलं की, 'विजय मल्ल्याकडून १४,१३१.६ कोटी रूपयांची संपत्ती ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत देण्यात आलीय. तसेच नीरव मोदी यांच्या प्रकरणात १,०५२.५८ कोटी रूपये वसूल करण्यात आलं. तर चोक्सीकडून २,५६६ कोटी रूपयांची संपत्ती वसूल करण्यात आली असून, त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ईडी आणि बँकांनी संयुक्तपणे विशेष न्यायालयाच्या माध्यमातून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या विरोधात कारवाई केलीय,' अशी माहिती सीतारामण यांनी दिली.

nirmala sitharaman on vijay mallya
Nirmala Sitharaman : फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब; काय म्हणाल्या निर्मला सीतारामन, पाहा Video

कुणालाही नाही सोडणार, प्रत्येकाच्या मागे लागणार

अर्थमंत्री निर्माला सीतारमण म्हणाल्या, 'पीएमएलए कायद्यानुसार ईडीने महत्वाच्या प्रकरणांमधून किमान २२,२८० कोटी रूपयांची संपत्ती जप्त केलीय. आम्ही कुणालाही सोडणार नाही, जरी ते देश सोडून गेले असले तरीही, आम्ही त्यांच्या मागे आहोत. ईडीने हे पैसे जमा करून बँकांना परत दिले आहेत. आर्थिक घोटाळे करणाऱ्या एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. जो पैसा बँकांचा आहे, तो पैसे बँकांना परत मिळालेच पाहिजेत.' असंही त्या म्हणाल्या.

nirmala sitharaman on vijay mallya
VIDEO: २० लाख तरूणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार कर्ज, Nirmala Sitharaman यांची घोषणा

काळा पैसा जमा करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करणार का?

विदेशात काळा पैसा जमा करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करणार का? असा प्रश्न काही खासदारांनी विचारला होता. यावर सीतारमण म्हणाल्या, '२०१५ साली काळा पैसे कायदा लागू करण्यात आला. यातून अनेक करदात्यांवर प्रभाव पडला. परदेशात असलेल्या संपत्तीची काहींनी स्वत: हून माहिती दिली आहे. विदेशातील संपत्ती उघड करणाऱ्यांची संख्या २०२१ - २०२२ साली ६०,४६७ वरून २०२४ -२५ पर्यंत दोन लाख झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com