दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती देशभरात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी तरुणांमध्ये ऊर्जा, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिर्मितीची भावना जागवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालयांमध्ये स्वामी विवेकानंदाचे विचार पोहोचले जातात. त्यांचे विचार लोक मोठ्यासंख्येने आजही फॉलो करतात.
तरुण पिढी जास्त मेहनत न घेता हताश होऊन यशापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात. पण विवेकानंदांचे विचार तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतात. तरुणांना नवी दिशा देतात. त्यांच्या विचारांमधून मिळणाऱ्या प्रेरणाबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांत माहिती घेऊया.
स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना राष्ट्राची खरी ताकद मानले आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन तरुणांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, यासाठी १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.
स्वामी विवेकानंद हे फक्त अध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते आधुनिक भारताचे विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी भारतीय संस्कृतीची ताकद जगासमोर प्रभावीपणे मांडली. “मला फक्त १०० ऊर्जावान तरुण द्या, मी देशाचा कायापालट करून दाखवीन,” या त्यांच्या वाक्यातून तरुणांवरील त्यांचा प्रचंड विश्वास दिसून येतो.
स्वामी विवेकांनद म्हणतात, एक विचार घ्या आणि त्यालाच जीवनाचा आधार बनवा. कामात सातत्य, मेहनत आणि एकाग्रता याशिवाय यश शक्य नाही, हे त्यांनी ठामपणे मांडले आहे. तसेच स्वतःवर विश्वास नसेल तर कोणतीही मोठी गोष्ट साध्य होऊ शकत नाही, असे विवेकानंदांचे मत आहे. स्वतःला कमी लेखणे हेच सर्वात मोठं पाप असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
जीवनातल्या संकटांना घाबरून न पळता त्यांचा धैर्याने सामना करा, हा त्यांचा संदेश होता. “निर्भय बना” हा मंत्र आजही तरुणांसाठी मार्गदर्शक ठरतो. तर गोरगरिबांची, गरजूंची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा, असा विवेकानंदांचा विचार आहे. समाजासाठी जगण्यातच जीवनाचे खरे सार्थक आहे, असे त्यांनी शिकवले.
शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर चारित्र्यनिर्मिती आहे. जे शिक्षण माणसाला स्वावलंबी बनवत नाही, ते निरर्थक असल्याचे विवेकानंदांनी स्पष्ट केले आहे. आजच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण युगात विवेकानंदांचे विचार मानसिक बळ देतात.
तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मूल्ये, आत्मिक शक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच यशाचे खरे गमक आहे, याची आठवण राष्ट्रीय युवा दिन करून देतो. हे विचार एकदा वाचले की डोक्यात पक्के होतात आणि तुमच्या यशाच्या वाटा मोकळ्या होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.