Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक आठवड्यात ग्रहस्थिती बदलते आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या राशींवर होतो. या आठवड्यात काही राशींनी विशेषतः आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
Weekly Horoscope
Weekly HoroscopeSaam Tv
Published On

मेष

संक्रातीचा सप्ताह प्रतिष्ठा वाढविणारा राहील. तरुणांना नवीन नोकरी, पदोन्नती मिळेल. १० ते १२ जानेवारी या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तर, १६ ते १७ जानेवारी रोजी मानसन्मान मिळेल.

वृषभ

प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. १० ते १२ जानेवारी या काळात तरुणांचे विवाह जमतील. १३ ते १५ या काळात आरोग्याची काळजी घ्यावी. १६ ते १७जानेवारी हा काळ भाग्योदयकारक राहील.

मिथुन

संक्रातीच्या काळात प्रवास जपून करावा. १० ते १२ जानेवारी या काळात नोकरीत बदल, हितशत्रूचा उपद्रव संभवतो. १३ ते १५ जानेवारी या काळात वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. १६ ते १७तारखेला प्रतिकूल स्थिती राहील.

कर्क

भागीदारीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. १० ते १२ या काळात संततीविषयी कामे होतील. १३ ते १५ या काळामध्ये नोकरीत बदल किंवा बदली होतील, तर १५ ते १७ या काळामध्ये वादविवाद टाळावेत.

सिंह

नोकरीत बदल-पदोन्नती होईल. १० ते १२ जानेवारी या काळात घर-प्रॉपर्टीची कामे होतील. १३ ते १५ जानेवारी या काळात शेअर मार्केटमध्ये लाभ होईल.

कन्या

तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. १० ते १२ जानेवारी हा काळ छोटे प्रवास, सहली होतील, तर १३ ते १५ जानेवारी या काळात घर, जागेची कामे होतील.

Weekly Horoscope
Lucky Zodiac Sign: आजचा दिवस धार्मिक कार्यांसाठी उत्तम; या चार राशींना मिळणार यश आणि सन्मान

तूळ

घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. १० ते १२ जानेवारी पैशांची कामे होतील. १३ ते १५ जानेवारी या काळात नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. १६ ते १७ जानेवारी या काळात मतभेद-वादविवाद टाळावेत.

वृश्चिक

सप्ताहात कर्तृत्व सिद्ध होईल. १० ते १२ जानेवारीमध्ये आरोग्यात सुधारणा होईल. १३ ते १५ या काळात पैशांची कामे होतील. १६ ते १७ दरम्यान प्रवास होतील.

धनू

कर्जाची कामे पूर्ण होतील. १० ते १२ जानेवारी या काळात मोठे प्रवास होतील, १३ ते १५ जानेवारी या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, १६ ते १७जानेवारीमध्ये मोठी गुंतवणूक होईल.

मकर

सप्ताहात आरोग्यात चांगली सुधारणा होईल. १० ते १२ जानेवारी मोठे लाभ होतील. १३ ते १५ या काळात प्रवास, मोठे खर्च होतील. १६ ते १७ जानेवारीमध्ये शत्रूवर विजय मिळेल.

Weekly Horoscope
Lucky zodiac signs: आजचा दिवस का आहे विशेष? पंचांग, ग्रहस्थिती आणि चार भाग्यवान राशी जाणून घ्या

कुंभ

सप्ताहात मोठे खर्च होतील. व्यापारात नुकसान संभवते. १० ते १२ जानेवारी या काळात नोकरीमध्ये बदल होईल, १३ ते १५ या काळात मित्रांचे सहकार्य मिळेल व १६ ते १७जानेवारी या काळात कर्जाची कामे होतील.

मीन

नोकरी-व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. १० ते १२ जानेवारीमध्ये मुलाखतीत यश मिळेल, १३ ते १५मध्ये पदोन्नती, मानसन्मान मिळेल आणि १६ ते १७या काळात निवडणूक-स्पर्धेत यश मिळेल.

Weekly Horoscope
Zodiac signs: ११ जानेवारीचा दिवस कसा असेल? पंचांगानुसार चार राशींना अनुकूलता

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com