Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Kalyan Dombivli Municipal Election News : केडीएमसी निवडणुकीतील पॅनल क्रमांक १८ मध्ये बनावट पॅम्प्लेट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप करत महायुतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?
Kalyan Dombivli Municipal Election NewsSaam tv
Published On
Summary
  • केडीएमसी पॅनल १८ मध्ये बनावट पॅम्प्लेट व्हायरल

  • सोशल मीडियावर चुकीचा प्रचार केल्याचा आरोप

  • मतदारांची दिशाभूल केल्याचा महायुतीचा दावा

  • निवडणूक आयोगाकडे तक्रारीचा इशारा

संघर्ष गांगुर्डे, कल्याण डोंबिवली

राज्यात २९ महापालिकांच्या निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच या निवडणुकांसाठी प्रचाराला दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता केडीएमसी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका पॅनल क्रमांक १८ मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेतीवली परिसरात सोशल मीडियावर एक बनावट पॅम्प्लेट व्हायरल झाल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणी भाजप शिवसेना महायुतीने खोडसाळपणाचा गंभीर आरोप केला आहे.

पॅनल क्रमांक १८ मध्ये भाजपच्या रेखा चौधरी या एकमेव उमेदवार बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपकडून स्नेहल मोरे तर शिवसेनेकडून मल्लेश शेट्टी आणि नवीन गवळी हे उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या पॅम्प्लेटमध्ये दोन धनुष्यबाण आणि एक कपाटाचे चिन्ह दाखवण्यात आले असून, कमळाऐवजी कपाट हे चिन्ह वापरून आमचं ठरलंय अशा आशयाचा प्रचार केल्याचा आरोप महायुतीने केला आहे.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?
Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

या पॅनलमध्ये शिवसेनेचे बंडखोर मनोज चौधरी यांच्या पत्नी अपक्ष म्हणून कपाट या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप महायुतीच्या उमेदवारांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुतीचे उमेदवार मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, स्नेहल मोरे यांच्यासह भाजपचे निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?
HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

बनावट पॅम्प्लेट तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरोधात निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. पराभवाची भीती असल्यानेच विरोधकांकडून असा खोडसाळपणा केला जात आहे. महायुती मजबूत असून आम्ही एकत्रितपणेच या पॅनलमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहोत,असा ठाम दावा यावेळी महायुतीच्या उमेदवारांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com