Sakshi Sunil Jadhav
चेहऱ्यावर आलेला पिंपल लगेच बरा व्हावा म्हणून अनेक जण तो फोडतात. मात्र ही सवय त्वचेसाठी गंभीर नुकसानदायक ठरू शकते. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, पिंपल फोडणे हा उपाय नसून समस्या वाढवणारी कृती आहे.
हातांनी पिंपल फोडल्याने जंतुसंसर्ग पसरतो आणि एक पिंपल अनेक पिंपलमध्ये बदलू शकतो. ही स्थिती रात्रीच्या वेळेस नकळत घडते.
पिंपल दाबल्यावर त्वचेचा नैसर्गिक संरक्षण थर नष्ट होतो, त्यामुळे सूज आणि वेदना वाढतात.
पिंपल फोडल्यामुळे चेहऱ्यावर कायमस्वरूपी डाग राहण्याची शक्यता असते.
सतत पिंपल फोडल्यावर त्वचेतलं कोलाजन कमजोर होतं, त्यामुळे त्वचा लवकर वृद्ध दिसते.
फोडलेला पिंपल जखमेच्या स्वरूपात बदलतो, ज्याला बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो.
चुकीच्या पद्धतीने पिंपल फोडल्यावर मूळ समस्या सुटत नाही, उलट पिंपल पुन्हा येण्याची शक्यता वाढते.
सतत छेडछाड केल्याने त्वचा कोरडी, जळजळणारी आणि सेंसिटीव्ह होते.
त्वचारोगतज्ज्ञ पिंपल फोडण्याऐवजी सौम्य अँटीसेप्टिक क्लींजर, टोनर आणि डॉक्टरांनी सुचवलेले औषध वापरण्याचा सल्ला देतात.