Sakshi Sunil Jadhav
आजच्या काळात एमरजन्सी किंवा वाढत्या गरजांसाठी कर्ज घेणं सामान्य झालं आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने केलेले पैशांचे व्यवहार नात्यांमध्ये दुरावा आणि आर्थिक ताण निर्माण करू शकतात. चाणक्य नीतीमध्ये कर्जाबाबत काही स्पष्ट नियम सांगितले आहेत, जे आजही तितकेच महत्वाचे आहेत.
चाणक्यांच्या मते, फक्त खूपच गरज असेल तरच कर्ज घ्या. शॉक पूर्ण करण्यासाठी घेतलेलं कर्ज भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण करू शकतं.
कर्ज घेण्याआधी आपण ते वेळेत फेडू शकतो का? याचा प्रामाणिकपणे विचार करा. नाहीतर तुमचा आर्थिक ताण वाढू शकतो.
कोणतीही आर्थिक योजना नसताना घेतलेलं कर्ज भविष्यात ताण, चिंता आणि कर्जबाजारीपणाकडे नेऊ शकते.
बँक, आर्थिक संस्था किंवा विश्वासू व्यक्तीकडून घेतलेलं कर्ज सुरक्षित असतं. संशयास्पद स्रोतांकडून पैसा घेणं धोकादायक ठरू शकतं.
चाणक्य सांगतात, “पैसे देताना विचार करा.” कोणालाही विचार न करता पैसे देणं म्हणजे वादाला आमंत्रण देण्यासारखं आहे.