Famous Actor Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; रेस्टॉरंटमध्ये आढळला मृतदेह, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. अभिनेत्याने 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे.

मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.

अभिनेत्याने 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्याचा मृतदेह रेस्टॉरंटमध्ये आढळला.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. दक्षिण कोरियाचे सुप्रसिद्ध अभिनेते पार्क डोंग बिन (Park Dong-bin) यांचे निधन झाले. वयाच्या ५६ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चाहत्यांमध्ये ते 'ज्यूस अंकल' (Juice Uncle) या नावानेही अत्यंत लोकप्रिय होते.'Mission: Kidnap The Top Star', 'Gingko Bed' आणि 'How To Keep My Love' यांसारख्या प्रोजेक्टमधून अभिनेत्याने प्रेक्षकांचे मन जिंकली.

TOI च्या वृत्तानुसार, 'Maeil Business' या संस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला असून, प्योंगटेक (Pyeongtaek) येथील त्यांच्या एका रेस्टॉरंटमध्ये अभिनेते मृत अवस्थेत आढळले. हे रेस्टॉरंट ते लवकरच सुरू करण्याच्या विचारात होते. २९ एप्रिल रोजी दुपारी ४:२५ वाजता रेस्टॉरंटच्या कामात मदत करणाऱ्या त्यांच्या एका जवळच्या मित्राला ते या अवस्थेत आढळले.सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार प्योंगटेक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना यात कोणत्याही प्रकारचा संशयास्पद प्रकार किंवा आत्महत्येची चिठ्ठी आढळलेली नाही. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांचे अंत्यसंस्कार आणि श्रद्धांजली सभा ग्योंगगी (Gyeonggi) प्रांतातील 'Anseong Civic Funeral Hall' येथे पार पडली. या ज्येष्ठ अभिनेत्याच्या पश्चात त्यांची पत्नी, अभिनेत्री ली सांग यी (Lee Sang Yi) आणि त्यांची लहान मुलगी असा परिवार आहे.

मनोरंजन विश्वातील कारकिर्द

मनोरंजन क्षेत्रात जवळपास ३० वर्षे कार्यरत असलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत अनेक कोरियन नाटके आणि चित्रपटांमध्ये काम केले. १५ ऑक्टोबर १९६९ रोजी जन्मलेल्या पार्क यांनी १९९० च्या सुमारास विविध टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'Shiri' या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली.

अभिनेत्याने विविध प्रकारच्या (genres) कलाकृतींमध्ये काम केले आहे. 'The Huntresses', 'It Can Be Done', 'All About Kimchi', 'The Great Wife' आणि 'Enemies From a Past Life' यांसारख्या काही कलाकृतींचा समावेश त्यांच्या गेल्या काही वर्षांतील अत्यंत लोकप्रिय कामांमध्ये होतो. 'ज्यूस अंकल' हे नाव त्यांना 'I Love You, I’m Sorry' या नाटिकेतील त्यांच्या एका गाजलेल्या भूमिकेमुळे मिळाले होते. चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी पार्क डोंग बिन यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : राक्षस! ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; नराधम आरोपीची 'डर्टी हिस्ट्री' वाचून तुमचाही थरकाप उडेल

Gold Price Today : आज पुन्हा सोन्याचे दर बदलले, खरेदीआधी वाचा 22k,24k,18k सोन्याचे ताजे दर

Maharashtra News Live Update: श्रीवर्धन म्हसळा रोडवर पिक अप आणि ट्रेलरचा अपघात

Rose Water Benefits For Skin: उन्हाळ्यात काळा झालेला चेहरा चमकून निघेल, असा करा गुलाब पाण्याचा वापर

Jio Cheapest Recharge : Jioचा 100 रुपयांचा रिचार्ज प्लान, मिळेल 6GB डेटा अन्...

SCROLL FOR NEXT