Gold Price Today : आज पुन्हा सोन्याचे दर बदलले, खरेदीआधी वाचा 22k,24k,18k सोन्याचे ताजे दर

Latest 18K, 22K, 24K Gold Price : आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा ₹३३० ची वाढ नोंदवली गेली आहे. २२k, २४k आणि १८k सोन्याचे ताजे दर जाणून घ्या
Jalgaon gold price today
Jalgaon gold price today Saam tv marathi
Published On

Gold rate today per gram : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार सुरू आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण शनिवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा आज ३३० रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असताना झालेली ही दरवाढ खरेदीदारांच्या बजेटवर परिणाम करणारी ठरू शकते.

सोमवारपासूनच सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. शुक्रवारी थोडासा दिलासा मिळाला होता. पण शनिवारी देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. साप्ताहिक सुट्टीमुळे देशांतर्गत वायदे बाजार मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मधील व्यवहार आज बंद आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून घसरण झाल्यानंतर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या दरात वाढ नोंदवली गेली.

Jalgaon gold price today
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना सरकार मोठं गिफ्ट देणार, एकाचवेळी खात्यात खटाखट ₹४५०० येणार? वाचा अपडेट

देशात आज सोन्याचे दर किती?

२४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १५,०९३ रुपये इतका आज नोंदवण्यात आला आहे. यामध्ये ३३ रूपयांनी वाढ झाली आहे. तर २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १३,८३५ रुपयांवर आला आहे. तर १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ११,३२० रुपये झाला आहे. २२ कॅरेट सोन्यात प्रति ग्रॅम ३० रूपयांची तर १८ कॅरेट सोन्यात प्रति ग्रॅम २५ रूपयांची वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ३३० रूपयांनी वाढून १,५०,९३० रुपये झालाय. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,३८,३५० रूपये इतकी झाली आहे. यामध्ये ३०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा २५० रूपयांची वाढ झाली आहे.

Jalgaon gold price today
Plane Crash : खेळाडूंना घेऊन जाणारे विमान झाडांवर कोसळले; ५ जणांचा मृत्यू

सोन्याचे भाव का वाढले ?

सराफा बाजारातील काही तज्ज्ञांच्या मते, आखाती देशात सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या मागणीत अचानक वाढ झाली. त्याशिवाय लग्नसराईच्या हंगामामुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळेच सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज सराफा बाजारत २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३३० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, सोन्याचे दर हे दररोज बदलत असतात. वरील दरांमध्ये जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील स्थानिक सराफा दुकानात जाऊन अंतिम दराची खात्री नक्की करावी.

Jalgaon gold price today
महागाईचा भडका! व्यावसायिक सिलिंडरनंतर घरगुती गॅस ₹५० ने महागणार, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा अंदाज; सरकारकडून स्पष्टीकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com