महागाईचा भडका! व्यावसायिक सिलिंडरनंतर घरगुती गॅस ₹५० ने महागणार, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा अंदाज; सरकारकडून स्पष्टीकरण

Petrol-Diesel Prices : घरगुती गॅस सिलिंडर ₹५० ने महागण्याची शक्यता असून पेट्रोल आणि डिझेल दरातही वाढ होऊ शकते. कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे पुढील काही दिवसांत निर्णय घेणार आहे.
Petrol-Disel Price Hike
Petrol-Disel Price HikeSaam Tv
Published On

Petrol diesel price increase : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीनंतर आता पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (१ मे २०२६) व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये ९९३ रूपयांनी वाढ झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये ४ ते ५ रूपयांची वाढ होऊ शकते. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रूपयांपर्यंतची वाढ होण्याचा अंदाज आहे. आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किंमती १२० डॉलरच्या पार झाल्या आहेत. मागील ३ ते ४ महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पण याचा भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर परिणाम झाला नव्हता. पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ५ रूपयांपर्यंत वाढ होऊ शकते. तर घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ५० रूपयांपर्यंत वाढू शकतात.

आखाती देशात इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे एलपीजी गॅस, पेट्रेल आणि डिझेलच्या दरात वाढ केली जाऊ शकते. तेल कंपन्या आणि सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकारने इंधनाच्या दरात वाढ करण्याचा विचार केला आहे. गुरूवारी ब्रेंट क्रूड तेलाच्या किंमती १२६ रूपयांवर पोहचल्या होत्या. मार्च २०२२ नंतर ही सर्वोच्च किंमत आहे. गेल्या काही दिवसांत सरकार आणि तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढवण्याचा सरकार विचार करत आहे.

Petrol-Disel Price Hike
दरवाढीचा भडका! LPG सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर
मागील ४ वर्षांत कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड चढ-उतार झाला आहे. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत. गेल्या ६० दिवसांपासून होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने कच्च्या तेलाच्या आयातीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. तरीही देशातील इंधनाच्या किमती वाढलेल्या नाहीत. जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. तरीही भारतात दर स्थिर आहेत.
हरदीप सिंग पुरी, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री

केंद्र सरकार सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करत आहे. पण अद्याप दरवाढीचा कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. आखाती देशात सुरू असलेल्या परिस्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुढील पाच ते ७ दिवसांत दरवाढीचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली तर ही ४ वर्षांतील पहिलीच दरवाढ असेल. कारण २०२२ नंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol-Disel Price Hike
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! इतक्या महिला ठरल्या पात्र, पण यांचा ₹१५०० चा लाभ कायमचा बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com