Pune : राक्षस! ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; नराधम आरोपीची 'डर्टी हिस्ट्री' वाचून तुमचाही थरकाप उडेल

Pune Bhor Rape Case Update News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत आरोपीचा जुना गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
NASARAPUR SHOCKING CASE: ACCUSED CRIMINAL HISTORY REVEALED IN PUNE DISTRICT INCIDENT
NASARAPUR SHOCKING CASE: ACCUSED CRIMINAL HISTORY REVEALED IN PUNE DISTRICT INCIDENTSaam Tv
Published On
Summary
  • नसरापूर परिसरात गंभीर गुन्ह्याची घटना उघडकीस आली आहे.

  • आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे.

  • ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन केले आहे.

  • पोलिसांकडून तपास आणि पुढील कारवाई सुरू आहे.

सागर आव्हाड , पुणे

Pune Bhor Nasarapur Rape Case Update पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेतील ६५ वर्षीय आरोपीने यापूर्वी देखील स्वतःच्या पुतणीवर आणि एका ७५ वर्षीय महिलेवर देखील बलात्कार केल्याचं आता समोर आलं आहे. आरोपी हा पाच-सहा वर्षांपूर्वी जेलमधून सुटून बाहेर आला होता. दरम्यान त्याने पुन्हा केलेल्या या कृत्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी आरोपीच्या फाशीची मागणी केली आहे. आता काय करावी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सुट्टीसाठी नसरापूर येथे आपल्या आजीकडे आली होती. दुपारच्या सुमारास ती राम मंदिर परिसरात खेळत असताना ६५ वर्षीय संशयित आरोपीने तिला आमिष दाखवून जवळच्या गोठ्यात नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. इतकेच नव्हे तर पुरावे लपवण्यासाठी त्याने मृतदेह शेणाने झाकल्याचेही उघडकीस आले आहे.

NASARAPUR SHOCKING CASE: ACCUSED CRIMINAL HISTORY REVEALED IN PUNE DISTRICT INCIDENT
Shocking : मावशीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला, नंतर ब्लॅकमेल करत बलात्कार केला, भाच्याच्या कृत्यानं कुटुंब हादरलं!

कुटुंबीयांनी मुलगी बराच वेळ परत न आल्याने शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ती संशयितासोबत जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवत तिचा मृतदेह एका गोठ्यात आढळून आणला. ही माहिती मिळताच गावात मोठी खळबळ उडाली आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

NASARAPUR SHOCKING CASE: ACCUSED CRIMINAL HISTORY REVEALED IN PUNE DISTRICT INCIDENT
Shocking : परीक्षेत कमी गुण मिळाले, ११ वीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; वडिलांची बंदूक घेतली अन्...

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नराधम आरोपी ५-६ वर्षांपूर्वी जेलमधून सुटून बाहेर आला होता,. त्याने ७५ वर्षीय महिलेवर तसेच स्वतःच्या पुतणीवर देखील बलात्कार केला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी तो दोन वेळा जेलमधून जाऊन आला होता. तरीही तो सुधारला नाहीच. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नसरापूर परिसरात रास्ता रोको आंदोलन केले तसेच आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “आरोपीला फाशी द्या” अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. ही घटना समाजातील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com