Boy Hair Cutting Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Boy Hair Cutting Viral Video: अतरंगी मुलाचे केस कापण्यासाठी आईचा देसी जुगाड, व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Latest Viral Video: हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Priya More

Social Media: लहान मुलं खूपच मस्तीखोर असतात. ते शांतपणे एका ठिकाणी अजिबात बसत नाही. त्यांना सांभाळणे म्हणजे पालकांसाठी मोठे आव्हान असते. लहान मुलं केस कापताना भोंगाट पसरवतात. या मुलांना शांत करणं म्हणजे खूपच कठीण असते. सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशाच एका लहान बाळाचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामुळे या बाळाच्या आईने देसी जुगाड करत त्याचे केस कापले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

एका आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. नेटिझन्स या आईच्या देसी जुगाडाचे खूपच कौतक करत आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला आपल्या लहान बाळाचे केस कापत आहे. पण बाळ तिला केस कापून देत नाही. त्यामुळे ही महिला एक बॉक्स घेते. बॉक्समध्ये बाळाला व्यवस्थित बसता येईल अशापद्धतीने त्याला कट करून घेते. या बॉक्समध्ये ती बाळाला बसवते. बाळाचे हात बॉक्समध्ये टाकते जेणे करुन तो केस कापताना व्यत्यय आणणार नाही. बाळाचे फक्त डोकं ती बॉक्सच्या वर ठेवते.

बाळाला बॉक्समध्ये व्यवस्थित बसवल्यानंतर ती बॉक्सला चिकटपट्टी लावून बंद करते. त्यानंतर ती ट्रिमिंग मशीनच्या सहाय्याने बाळाचे व्यवस्थित केस कापते आणि त्याचे टक्कल करते. बाळही न रडता आणि न मस्ती करता व्यवस्थित केस कापून देताना दिसत आहे. या आईने आपल्या मुलाची केस कापण्याची ही पद्धत अनेकांना खूपच आवडली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स पोट धरुन हासत आहेत.

हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी 'रुपिन शर्मा' (@rupin1992) यांनी 29 जून रोजी पोस्ट केला होता. या व्हिडिओला खूपच चांगली पसंती मिळत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 18 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 330 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. या आईने केलेला हा देसी जुगाड खूपच भन्नाट आणि उपयोगी असल्याच्या कमेंट्स नेटिझन्स करत आहेत. काहींनी तर आधुनिक समस्यांसाठी आधुनिक उपाय आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT