Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain Alert Saam TV

Rain News: राज्यात पुढील आठवडाभर मुसळधार! 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह होणार जोरदार पाऊस

राज्यात पुढील आठवडाभर मुसळधार! 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह होणार जोरदार पाऊस
Published on

Rain Alert News: राज्यातील विविध ठिकाणी पुढील आठवडाभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या अंदाजानुसार, कोकण गोवा या ठिकाणी येत्या 4 जुलै पर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस राहील. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या शिल्पा आपटे यांनी दिली.

Maharashtra Rain Alert
Small Savings Scheme: आनंदाची बातमी! अल्पबचत योजनांच्या ठेवीवरील व्याजदरात मोठी वाढ, मिळणार बक्कळ नफा

हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, येत्या आठवड्यात पुण्यात देखील आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत दमदार पाऊस

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर कायम आहे. या जिल्ह्यातील खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. परिणामी प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Rain Alert
Common Civil Law: समान नागरी कायद्याला शिवसेनेचा पाठिंबा, पावसाळी अधिवेशनात मांडणार समर्थन प्रस्ताव

जगबुडी नदी मोजे वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते. या नदीस जांबू उपनदी येऊन मिळते. या नदीच्या पुलावर वरून मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 हा जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com