shetkaryachi vaghin hard work video viral saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कष्टाची ताकद काय असते? ६० किलो वजन उचलणाऱ्या शेतकऱ्याच्या वाघीणीचा व्हिडीओ व्हायरल

shetkaryachi vaghin hard work video viral: सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याची वाघीण तब्बल ६० किलो वजन सहज उचलताना दिसते. लोकांनी हा व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केले असून तो काही तासांतच ट्रेंडिंगमध्ये आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मुलींच्या किरकोळ चुकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असे व्हिडीओ अनेकदा गमतीशीर टॅग देत सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. लोकंही या व्हिडीओचा आनंद घेतात. मात्र आता एक सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 'शेतकऱ्याची वाघीण' असा टॅग देण्यात आलाय.

सोशल मिडीयावर सध्या एक इंस्टाग्राम व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये एक महिला शेतकऱ्याची वाघीण म्हणून आपल्या क्षमतेचा, धैर्याचा आणि संघर्षाचा ठसा उमटवताना दिसतेयं. हा व्हिडीओ आपल्याला महिलांबाबत चांगला विचार करायला भाग पाडतो.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये एक पुरुष आणि महिला दिसून येतायत. हा पुरुष धान्याची गोणी टेम्पोतून बाहेर काढतानाच काम करतोय. यावेळी एक तरूण महिला धान्याच्या या मोठ्या जड गोणी तिच्या पाठीवर उचलून नेताना दिसतेय. तिच्या या कृत्यामुळे कोणतंही काम मुलींना अशक्य नाही असं दाखवण्यात आलं आहे.

गायी आणि म्हशींना खायला दिल्या जाणाऱ्या धान्याच्या या गोण्या असल्याचं पाहायला मिळतंय. या एका गोणीचं वजन जवळपास ६० किलो आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शेतकऱ्याची वाघीण असा या महिलेचा उल्लेख करण्यात आला आहे.

कॅप्शनमध्ये तिला 'शेतकऱ्याची वाघीण' असं म्हटलं आहे आणि ते शब्दशः खरं वाटावं असा तिने या व्हिडीओमध्ये काम केलंय. हे काम करत असताना चेहऱ्यावर ना तक्रार, ना दिखावा दिसून येतो. यावेळी फक्त काम पूर्ण करण्याची तयारी त्या महिलेची असल्याचं तुम्ही पाहू शकता.

युजर्सकडून महिलेचं कौतुक

सोशल मीडियावर हा तुफान व्हायरल होत असून, हजारो लोकांनी शेअर केलाय. काहींनी तिला 'अस्सल गावरान चटणी, भाकरीची ताकत आहे' असं म्हटलंय. तर काहींनी 'खरी ताकद अशीच असते' अशा प्रतिक्रिया दिल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Problem: 'त्या भूमिकेमुळे सरळ उभं राहता येत नाही...'; 'तारक मेहता' फेम अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

SCROLL FOR NEXT