Viral Video canva
व्हायरल न्यूज

Viral Video: युट्यूबरची भेटवस्तू पाहून गरीब मुलीच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे . या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी कपडे विकताना दिसतेय. या मुलीला एका यूट्यूबरने भेटवस्तू दिली. भेटवस्तू मिळाल्यामुळे त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. या व्हिडिओला नेटकऱ्याकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Banglore Viral Video: आजकालच्या महागाईमुळे अनेक लोकांचे हाल होताना दिसत आहेत. बेरोजगारी आणि गरिबी वाढत असल्याने अनेकांना छोटे-मोठे उद्योग करून पोट भरावे लागत आहे. काहींची परिस्थिती इतकी हलाकीची असते की, त्यांना त्यांच्या कुंटुबातील लहान मुलांना काम करण्यास सांगावं लागतं. आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल की रस्त्याच्याकडेला लहानमुले वस्तू विकत बसलेले असतात. परिस्थिती गरिबी आणि हलाकीची असल्याने त्यांना लहान वयात काम करणे भाग असते. त्यामुळे त्यांचे बालपण असेच काम करण्यात निघून जाते. पण बंगळूमधील एका घटनेमुळे अशा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद कसा आणता, येईल हे समजलंय. बंगळूरुमधील एका यूट्यूबरने रस्त्यावर कपडे विकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य कसं आणलं ते पाहू.

व्हायरल झालेला व्हिडिओ बंगळूरूमधला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्यावर कपडे विकताना दिसतेय. या मुलीला पाहून यूट्यूबर तिच्याकडे गेला. त्याने त्या मुलीली १० रुपयांमध्ये एक मिस्ट्री बॉक्स देण्याचा प्रोमिस केलं. त्या मुलीकडे पैसे नसल्याचे तिने सांगितले. मग त्याने एक रुपयांची मागणी केली. मात्र तिच्या पर्समध्ये एकही रुपये नसल्याचे तिने सांगितले.

त्यानंतर यूट्यूबरने मुलीला तो मिस्ट्री बॉक्स दिला आणि उघडायला सांगितले. तिने जेव्हा तो बॉक्स उघडला तेव्हा त्यामध्ये एक फास्ट्रॅकचे घड्याळ होते. ही भेटवस्तू त्या युट्यूबरने त्या मुलीसाठीच आणल्याचं सांगितलं. ही भेटवस्तू पाहून त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. ते पहून यूट्यूबर देखील खूश झाला.

ही भेटवस्तू यूट्यूबरने त्या मुलीसाठी आणल्याचे कळाल्यावर तिला आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट केला तेव्हा अनेक लोकांनी शेअर केलाय. हा व्हिडिओ पाहून लोकं कमेंट्सच्या माध्यमातून यूट्यूबरचे भरभरून कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Dwarka: द्वारका चौकाची कोंडी फुटणार; २१४ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

धुक्यामुळे रस्ता दिसला नाही, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Election: प्रशासनाचा भोंगळ कारभार; मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदी नियुक्ती

महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

Maharashtra Live News Update: ठाण्यात प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर.. परिसरात घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT