Bigg Boss OTT 2 : यूट्यूबर ध्रुव राठीची बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री

Bigg Boss OTT 2 Update : लोकप्रिय यूट्यूबर ध्रुव राठी या शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार आहे.
Dhruv Rathee Vaild Card Entry In Bigg Boss OTT 2
Dhruv Rathee Vaild Card Entry In Bigg Boss OTT 2Saam TV
Published On

Dhruv Rathee In Bigg Boss OTT 2 : बिग बॉस ओटीटी २, सध्या चर्चेत असलेला रिऍलिटी शो आहे. हा शो स्पर्धकांसह कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानमुले देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. बिग बॉस OTT सीझन 2चे स्पर्धक त्यांच्या फॅशन, विचार,कृतींमुळे सोशल मीडियावर ट्रेंड होत असतात.

या रिअॅलिटी शोने प्रेक्षकांना ट्विस्ट आणि टर्न्समध्ये शो बघण्यास भाग पडले आहे. अलीकडेच यूट्यूबर एल्विश यादव आणि अभिनेत्री आशिका भाटिया यांची शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक एन्ट्री झाली आहे. एल्विश आणि आशिकानंतर, आता लोकप्रिय यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठी या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार आहे. (Latest Entertainment News)

Dhruv Rathee Vaild Card Entry In Bigg Boss OTT 2
Ajmer 92 Trailer : अजमेरमध्ये २५० मुलींसोबत घडलं होतं घृणास्पद कृत्य? हृदय पिळवटून टाकणारा 'अजमेर 92'चा ट्रेलर प्रदर्शित

बिग बॉस OTT 2 त्याच्या अनोख्या पण लोकप्रिय स्पर्धकांसाठी ओळखला जातो. यूट्यूबर एल्विश यादव आणि अभिनेत्री आशिका भाटिया यांच्यानंतर, लोकप्रिय यूट्यूबर ध्रुव राठी या शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार आहे.

ध्रुव राठी हा सर्वात वादग्रस्त तरीही लोकप्रिय YouTubers पैकी एक आहे. शोमध्ये ध्रुवच्या येण्यामुळेशोला भरपूर कव्हरेज मिळेल. तसेच त्याच्या येण्याने यूट्यूब कम्युनिटी 'बिग बॉस ओटीटीविषयी क्रेझ निर्माण होईल.

लोकप्रिय YouTuber हा सोशल मीडिया क्रिएटर देखील आहे. तो सध्या बर्लिन, जर्मनी येथे त्याची पत्नी जुली एलबरसह राहतो. त्याच्या व्हिडिओंमध्ये, तो राजकारण, मिथ, धर्म आणि मनोरंजन यावर बोल्ट असतो. ध्रुवचे YouTube वर 1.4 बिलियन व्ह्यूज, 1.6 दशलक्ष फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोअर्ससह 11.8 दशलक्ष सबस्क्रिबर आहेत.

आज म्हणजे १७ जून रोजी होणाऱ्या भागात आज त्याची एन्ट्री होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com