(चेतन व्यास)
Wardha Loksabha Election Voter Share Photo On Social Media : वर्धा: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसरा टप्प्यात राज्यातील ८ ठिकाणी मतदान पार पडलं. मतदान पार पडत असताना काही असंवैधानिक घटना घडल्याचं समोर आलंय. वर्ध्यात दोन व्यक्तींनी मतदान करताना फोटो काढला आणि सोशल मीडियावर स्टेट्स ठेवला. ही घटना वर्ध्यातील पुलगावात घडल्याने मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसरा टप्प्यात राज्यातील ८ ठिकाणी मतदान पार पडलं. आज दिवसभरात ५३.५१ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आलीय. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याची घटना घडली. तर काही ठिकाणी उन्हामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. तर काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागल्याच्या घटना घडल्या.
वर्ध्यातील पुलगावात मतदान केल्याचा फोटो व्हायरल केल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यातील एका व्यक्तीने व्हाट्सअॅप ग्रुपवर मतदान केल्याचा फोटो व्हायरल केला. तर एकाने इन्स्ट्रागामवर स्टेटस ठेवले. मतदान करत असल्याचे फोटो एका पक्षाच्या सोशल मीडिया साईटवर हे फोटो व्हायरल करण्यात आलेत.
पुलगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बूथ क्र.87 च्या खोली क्रमांक तीनमधील व मतदान केंद्र क्रमांक 93 मध्ये ही या घटना घडल्यात. मतदारांनी हे फोटो एका पक्षाच्या सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये पोस्ट केले. मतदानाचा फोटो पोस्ट करताना या मतदाराने कोणत्या उमेदावाराला मतदान केलं याची माहिती दिली.
मतदान करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती देवळीच्या नियंत्रण कक्षाला फोनद्वारे मिळाली. नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच तपास करत याप्रकरणी कारवाई करण्यात आली. पुलगाव पोलिसांत आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. भादंविच्या कलम 188,आर डब्लू 128 लोक प्रतिनिधी कायदा 1951 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलिसांनी पुलगाव दोन्ही आरोपी ताब्यात घेतलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.