Maharashtra Election: नाशिकमध्ये नवा ट्विस्ट; ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात तिसऱ्याला उमेदवारी?

Nashik Loksabha Election: नाशिक लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट पहायला मिळतोय. छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने खळबळ उडाली आहे. पाहूया काय आहे भुजबळांची खेळी ? या खास रिपोर्टमधून
Nashik Loksabha Election
Nashik Loksabha ElectionSaam Tv

Nashik Loksabha Constituency Chhagan Bhujbal : महायुतीच्या जागावाटपाचा काही जागांवरील तिढा अद्यापही कायम आहे. नाशिक मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असणार ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. नाशिक ही शिवसेनेची हक्काची जागा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेवर दावा केलाय.

निवडणुकीतून माघार घेत असल्याचं छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सातत्यानं नाशिकवर दावा सांगितला आहे. आता तर भुजबळांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं खळबळ उडालीय. दिलीप खैरेंचे बंधू अंबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी पदाधिका-यांच्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांना नवा प्रस्ताव देण्यात आलाय. माजी खासदार देविदास पिंगळे आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाचा प्रस्ताव आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादीला द्या, आमच्याकडे ताकदीचे उमेदवार असल्याचा दावा बैठकीत करण्यात आला. दरम्यान, मला पक्षानं सांगितल्यास लोकसभा निवडणूक लढेन, असं कोकाटेंनी स्पष्ट केलं आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतंय. त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार ही बाब समोर येत आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादीचाच दावा राहतो का? हे पाहणं महत्वाचं आहे. एकूणच यानिमित्तानं महायुतीत आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे.

Nashik Loksabha Election
Maharashtra Election: शिरूरमधून भुजबळांना उमेदवारी देण्याचा होता प्लॅन; अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com