Kedar Jadhav IPL: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. लखनऊच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान आज होणाऱ्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे.
केदार जाधवचं पुनरागमन
भारतीय संघातील दिग्गज खेळाडू केदार जाधवचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पुनरागमन झाले आहे. याची घोषणा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर करण्यात आली आहे. डेव्हिड विली दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या ऐवजी केदार जाधवची निवड करण्यात आली आहे.
केदार जाधवच्या पुनरागमनामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा मद्यक्रम आणखी मजबूत झाला आहे. तो मधल्या फळीत फलंदाजी करून डाव पुढे नेऊ शकतो. तर गोलंदाजीत देखील मोलाचे योगदान देऊ शकतो. (Latest sports updates)
डेव्हिड विली का झाला बाहेर?
डेव्हिड विली बाहेर झाल्याने नक्कीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला धक्का बसला आहे. मात्र केदार जाधवच्या पुनरागमनाने संघात अनुभवी खेळाडूची भर पडली आहे. यापूर्वी देखील त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर डेव्हिड विली टाचेच्या दुखण्यामुळे आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याने या हंगमातील ४ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ३५ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत.
आज रंगणार रोमांचक सामना
आज लखनऊच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात केदार जाधव खेळताना दिसून येऊ शकतो. इथून पुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी सर्वच सामने महत्वाचे असणार आहेत. कारण जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर येणाऱ्या प्रत्येक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजय मिळवावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.