महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, पुण्यात भाजप ठाम शिंदेसेनेला घाम

BJP Shinde Sena Pune Civic Election Dispute: पुण्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे... त्यात भाजपनं जागावाटपात ठाम भूमिका घेतल्यानं शिंदेसेनेत अस्वस्थ आहे...तसचं जागावाटपाच्या चर्चेत शिंदेसेनेतील अंतर्गत वादही उफाळून आलाय..पुण्यात महायुतीत नेमकं काय घडतयं?
Leaders of BJP and Shinde Sena amid growing tension over seat sharing in Pune civic elections.
Leaders of BJP and Shinde Sena amid growing tension over seat sharing in Pune civic elections.Saam tv
Published On

पुण्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटत नाहीय... शिंदेसेना आणि भाजपनं पुण्यात युतीचा निर्णय घेतला... मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिंदेसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय... भाजप शिंदेसेनेला फक्त 15 जागा देण्यावर ठाम असल्यानं 30 ते 35 जागांची मागणी करणारी शिंदेसेना पुण्यात 25 जागांच्या आग्रही मागणीसह तडजोडीपर्यंत पोहचलीय.. तर सर्वच सर्व जागा लढण्य़ाची तयारी असलेला भाजप शिंदेसेनेसोबत युतीसाठीही सकारात्मक आहे.

दुसरीकडे शिंदेसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांसाठी फिल्डिंग लावत, 25 जागांवर तडजोड करण्याची भूमिका घेतल्यानं पक्षातही नाराजीनाट्याला सुरुवात झालीय. जागावाटपाच्या बैठकीतून अंतर्गत गटबाजीमुळे नाराज झालेले नाना भानगिरे तर तडकाफडकी बाहेर पडले. जागावाटपातील तिढा एवढा वाढलाय की शिंदेसेनेतील नेत्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीशीच युती करण्याचा इशारा दिलाय...

दरम्यान इलेक्टिव्ह मेरिट नसलेल्या जागांवर शिंदेसेनेनं दावा केल्यानं भाजपही आपल्या भूमिकेवर ठाम आहे... अशातच महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं 100 उमेदवारांची अंतिम यादी तयार केल्याचीही चर्चा आहे...त्यामुळे शिंदेसेनेतील अस्वस्थता आणखी वाढलीय...आता पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांभाळणं आणि भाजपवर दबाब आणून अधिकच्या जागा घेणं अशी तारेवरची कसरत एकनाथ शिंदेना करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com