Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : आगाऊपणा तरुणाच्या अंगलट! पुराच्या पाण्यात दुचाकी घातली, पुढे घडलं भयंकर, पाहा VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय सुर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे अनेक छोट्या मोठ्या नदी नाल्याना पूर आलाय.अशा पुरातून काही तरुण आपला जीव धोक्यात घालून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत.असाच काहीसा पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न एक तरुण करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गजानन बनसोडे असं या तरुणाच नाव आहे. हा तरुण आपली मोटारसायकल(Bike) घेऊन पुराच्या पाण्यातून जाण्याचं धाडस करतोय.त्याला या पुराच्या पाण्यातून जाण्यास मज्जाव करण्यात आला.

ही घटना नांदेडच्या हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील पांडव पुलावर घडली. त्याला विनंती देखील करण्यात आली.परंतु हा तरुण या नागरिकांचे काही न ऐकता या पुरात(flood) मोटरसायकल घेऊन नदी पार करण्याचा प्रयत्न करतोय.परंतु त्याचा हा प्रयत्न फसला असून त्याची मोटरसायकल या पाण्यात वाहून गेली आहे.सुदैवाने तो वाचला.साध्य हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.अस जीव घेणे धाडस करू नका असे आवाहन देखील या व्हिडिओच्या माध्यमातून एक व्यक्त करत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्ही पाहू शकता की, संपूर्ण परिसरात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहे. त्यातच एक तरुण जेथे पाणी नाही तेथे बाईकवर बसलेला आहे. परंतू काही वेळानंतर तरुण बाईक घेऊन पुराच्या पाण्यातील रोडवर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हळू हळू तो पूराच्या वाहत्या पाण्यातून जातो. मात्र काही वेळात पाण्याचा प्रवाह जोरात होतो आणि तो बाईकवरुन खाली पडतो. शेवटी तुम्ही पाहू शकता की, तरुणाची बाईक पूराच्या पाण्यात वाहून जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT