वाढदीवस असो किंवा लग्नसमारंभ कोणत्याही कार्यक्रमाची शोभ वाढवण्यासाठी नवनवीन सजावटीचे प्रयोग केले जातात. सध्या लग्नसंमारंभात,वाढदिवसांच्या कार्याक्रमात इव्हेंट मॅनेजमेंट करणारी मंडळी वेगवेगळी सजावट करत असतातच. परंतू काही सजावट ही आपल्या जीवावर बेतू शकते. वाढदिवसाच्या वेळी गॅसने भरलेल्या फूग्यांचा स्फोट तुम्ही बघीतले असतीलच. तसेच लग्नात नवरा-नवरी क्रेन वरुन पडतांना तुम्ही पाहीलंच असेल. असाच एक प्रकार एका लहान मुलीच्या वाढदीवशी घडलाय.
आई वडीलांनी आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात करण्याच ठरवंल होतं. वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी कोली होती. पहिला वाढदिवस होता म्हणून सजावट(Decoration) सूद्धा चांगली करण्यात आली होती. आई-वडील आपल्यामुलीसोबत हॉलमध्ये इंट्री ठेवली होती.
तेंव्हा इंट्रीच्या दोन्ही बाजूला फट्याक्यांची आतिशबाजी करण्यात आली होती. तेंव्हा एक फटाका अचानक फुटून आई (Mother's) वडीलांना लागल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे. परंतू या घटेनेत लहानग्या मुलीला कोणतीही इजी झाली नाही. फटाक्याच्या आवाजानं लहान मुलगी घाबरली आणि रडायला लागली.
पण या घटनेत लहान मुलगी थोडक्यात बचावली आहे. त्यामुळे वाढदिवस (birthday)साजरा करतांना काळजी घ्या. विवीध प्राकारची सजावट करा. परंतू त्या सजावटींचा कोणावर दुषपरीणाम होणार नाही याची काळजी घेत चला.. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.. pradip_dhiman यांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.