Shocking : लोकलमधील स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल, तरुणाचा शोध घेत पोलीस घरी धडकले, पण त्याला एक हात आणि पायच नव्हता, Video

Viral Video of Mumbai Local Train : लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणे एका तरुणाला चांगलंच भोवलंय. धावत्या ट्रेनमधून पडल्याने या तरुणाचे हात आणि पाय तुटले आहेत. फरहत आझम शेख, असं या तरुणाचं नाव आहे.

सोशल मीडियावर रील बनवून हिरो बनण्याच्या नादात अनेकजण आपला जीव धोक्यात टाकतात. मागील काही दिवसांपासून मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये अनेक टवाळखोर तरुण जीवघेणी स्टंटबाजी करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या तरुणांना शोधून पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवलाय. पण तरी देखील त्यांची स्टंटबाजी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये.

अशातच एक धक्कादायक प्रकार आणि तितकीच दुर्दैवी घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी एका तरुणानं धावत्या लोकलच्या फुटबोर्डवर लटकून फलाटावर त्याच वेगाने धावून स्टंटबाजी केली होती. त्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या तरुणाच्या शोधात पोलीस त्याच्या घरी जाऊन पोहोचले. त्यावेळी त्यांना चांगलाच धक्का बसला. स्टंटबाजीचा नाद लागलेल्या या तरुणाने दुसऱ्या ठिकाणी अशाच प्रकारे धावत्या लोकलमधून स्टंटबाजी करताना एक हात आणि पाय गमावल्याचे दिसून आले.

लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणे या तरुणाला भोवलं. धावत्या ट्रेनमधून पडल्याने या तरुणाचे हात आणि पाय तुटला आहे. फरहत आझम शेख असं या तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरहत हा नेहमीच धावत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करायचा. त्याच्या स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. पोलिसांनी फरहतला शोधून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र तरी देखील त्याचा स्टंटबाजीचा प्रकार सुरूच होता.

दरम्यान, फरहतने मशीद बंदर या रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये पुन्हा स्टंट केला. तो गर्दीने भरलेल्या ट्रेनला लटकून प्रवास करत होता. यावेळी त्याचा अचानक हात निसटला आणि तो खाली पडला. फरहतला इतका मार लागला की, यामध्ये त्याचा एक पाय आणि एक हात तुटला.त्यामुळे त्याला कायमचं अपंगत्व आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com