Nanded Crime News: नांदेड ते लातूर, विविध जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल ६१ मोटारसायकल जप्त

Nanded News: मराठवाड्यात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv

संजय सूर्यवंशी, नांदेड|ता. २१ मार्च २०२४

Nanded Crime News:

मराठवाड्यात मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये तब्बल ६१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यात मोटारसायकल चोरणारी टोळी सक्रिय होती. पोलीस या टोळीचा शोध घेत होते. अखेर नांदेड पोलिसांनी या मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये 6 आरोपीना पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून तब्बल 61 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

या टोळीतील दोन जण फरार आहेत. त्या फरार चोरट्याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. अजून या कारवाईमध्ये जवळपास 50 मोटारसायकली मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान ही मोटारसायकल चोरणारी टोळी खेडे गावात चोरी केलेल्या मोटारसायकल विक्री करीत आहेत, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे खेडे गावातील नागरिकांनी अशा चोरीच्या मोटारसायकल खरेदी करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crime News
Lok Sabha Elections 2024: रेशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा मिळणार नाही, आचारसंहितेमुळे वाटपास प्रतिबंध

नांदेडमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त..

ऐन निवडणूकीच्या काळात पोलिसांनी नांदेड शहरात मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. 49 तलवारी, 94 खंजर, 7 गुप्ती आणि दोन बिचवा जप्त करण्यात आल्या आहेत. नांदेडच्या वजीराबाद पोलिसांनी ही कारवाई केली.

निवडणुकीच्या काळात शस्त्र विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार वजीराबाद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या नेतृत्वात पथकाने गुरुद्वारा परिसरातील तीन दुकानावर धाडी टाकल्या. यावेळी हा शस्त्रसाठा आढळून आला. (Latest Marathi News)

Crime News
Maharashtra Weather Forecast: मुंबईत उन्हाचा चटका वाढतोय; विदर्भात अवकाळीचं संकट कायम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com