विधानसभा निवडणुकीनिमित्त राज्यात राजकीय वातावरण तापलंय. हरीयाणातल्या विजयानं आत्मविश्वास वाढलेला भाजप आक्रमक झाला आहे. तर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत विजय मिळालेली काँग्रेस विधानसभाही जिंकण्यासाठी सज्ज झालीय.
भाजप आणि काँग्रेसचे हायकमांडही प्रचारात उतरलेत. एकीकडे नरेंद्र मोदी, अमित शाहा यांनी प्रचाराचा धुरळा उडवलाय. तर दुसरीकडे राहूल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जून खर्गे असे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मैदान गाजवतायेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'एक है तो सेफ है' असा नवा नारा दिला.
मतांच्या धुव्रीकरणाचं विरोधकांनी जोरदार राजकारण केलंय. या घोषणेची राहुल गांधींनी खिल्ली उडवलीय. मुंबईत पत्रकार परिषदेत सेफ म्हणजे तिजोरीच त्यांनी सर्वांसमोर आणली. या तिजोरीतून राहुल गांधींनी दोन पोस्टर्स बाहेर काढले. एका पोस्टरवर धारावी पुनर्विकास आराखडा आणि दुसऱ्या पोस्टरवर गौतम अदानींचा फोटो दाखवण्यात आलाय. अदानींसाठीच मोदींची ही घोषणा असल्याचा टोला लगावलाय.
राहुल गांधींच्या या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिलंय. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी 'एक है तो सेफ है राहूल गांधी फेक है', असा हल्लाबोल केलाय. लोकसभेला मुस्लिमांची एकगठ्ठा मते मविआला मिळाली होती. त्यामुळेच 'एक है तो सेफ है' आणि बटेंगे तो कटेंगे असा नारा मोदी आणि योगी आदीत्यनाथ यांनी दिला.
हिंदूंना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यावरुन राज्यातल्या भाजप नेत्यांनीच नापसंती दर्शवली आहे. अजित पवारांनीही महाराष्ट्रात हा नारा चालणार नसल्याचं स्पष्ट केलंय. इशारांच्या या राजकारणात मतदारराजा कोणाचं राजकीय भवितव्य सेफ करणार ते पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.