Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Maharashtra Election Update : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस पाहायला मिळाला. भरारी पथकाने कोट्यवधींची रोकड जप्त केली.
cash
file photo saam tv
Published On

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोफा थंडावल्या आहेत. राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार ६ वाजल्यापासून थांबवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील ४८ तास राजकीय पक्षांना बंदी असणार आहे. या कालावधीत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे. तर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस झाल्याचं दिसून आलं. या कालावधीत आयोगाच्या भरारी पथकाने कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भरारी पथकाचं राज्यातील सर्वच घडामोडींवर चोख लक्ष होतं. या कालावधीत काही ठिकाणी नाकाबंदी देखील होत्या. राज्यातील विविध नाकाबंदीत कोट्यवधींची रोकड जप्त केली.

महाराष्ट्रात आतापर्यंत ६६० कोटी १८ लाखांची जप्त करण्यात आली आहे. यात १५३ कोटी ४८ लाख रोकड पथकाकडून जप्त करण्यात आले. तर ७१ कोटी १३ लाखांची दारु देखील जप्त करण्यात आली. ७२ कोटी १४ लाखांचे अंमली पदार्थ, २८२ कोटी ४९ लाखांचे सोने-चांदी दागिने, ८० कोटी ९४ लाखांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. या विषयीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली.

मुंबईतही मोठी कारवाई

मुंबईतही निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. भरारी पथकाने मुंबई शहरात ३२ कोटी तर उपनगरात १२ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर मुंबईत सुमारे १२ लाख तर उपगनगरात १ कोटी रुपये किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले. तसेच ड्रग्ज मुंबईत सुमारे ४ कोटी तर उपनगरात ४४ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात एकूण १,०२,२९,७०८ मतदार आहेत. लोकसभेनंतर मुंबईत ५३,३७२ तर उपनगरात २,३७,७१५ इतके मतदार वाढले आहेत. मुंबईत एकूण मतदान केंद्रातील ८ केंद्रे ही दिव्यांगाद्वारे संचलित ३८ केंद्रे ही महिला संचलित आहेत. तर ३८ केंद्रे ही तरुण कर्मचारी वर्गाकडून संचलित आहेत. तसेच बेलॉर्ट युनीट १४,१७२ आहेत. कंट्रोल युनीट १२,१२० आहेत. तर व्हीव्हीपॅड १३,१३१ आहेत.

मतदान केंद्रावरील बंदोबस्तासाठी एकूण २५,६९६ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. अॅपद्वारे मुंबई उपनगरात ६१५ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यानंतर ५६३ तक्रारींवर कारवाई करण्यात आल्या. मुंबईत दाखल झालेल्या ६२३ पैकी ५६४ तक्रारींवर कारवाई करण्यात आली. कायदा सुवस्था अनुषंगाने दखलपात्र आणि अदखलपात्र ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com