Sangli Video: कृष्णा नदीच्या पुरात तरुणांची स्टंटबाजी; थोडक्यात बचावले! पाहा व्हिडिओ.

Sangli Krishna River flood: सांगतील कृष्णा नदीला पूर आला आहे. या पुरात तरुणांना स्टंटबाजी करणं चांगलच अंगलट आलं आहे. विद्युत पोलच्या आधारामुळे तरुण थोडक्यात बचावले आहेत.

सांगली : कृष्णा नदीच्या पुरात पोहणे तरुणांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलिसांना चकवा देत कृष्णा नदीत तरुणाने उडी मारली. त्यानंतर पाण्याच्या वाढत्या प्रवाहात अडकून बसला. त्या तरुणाला वाचवण्याचा थरार सुरू झाला आणि रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले.

पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने सदरचे तरुण हे वाहत जात होता. पण सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला या तरुणांनी पकडून त्याचा आधार घेतला. थंड पाणी, मोठा प्रवाहामुळे या तरुणांना काही कळत नव्हते. सदरचा प्रकार कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी पोहणाऱ्या काही तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता कृष्णा नदी झेप घेऊन या तरुणांचा जीव वाचवला आहे. हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पाण्याचा वेग अधिक असल्याने धाप लागली. त्यामुळे एका डाबाचा आधार घेतला. तर दुसऱ्या मित्राने त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. असे दोघे तरुण निघून गेले. पोलिसांनी नदी काठी तगडा असा बंदोबस्त तैनात केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com