Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

ajit pawar vs yugnedra pawar : बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना होतोय. अशातच प्रचाराची सांगता होत असताना बारामतीचा लढा भावनिक वळणावर आल्याचं पाहायला मिळालं.. काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? हा प्रश्न आहे. पाहूया एक रिपोर्ट...

पुणे : बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार सामना होतोय. अशातच प्रचाराची सांगता होत असताना बारामतीचा लढा भावनिक वळणावर आल्याचं पाहायला मिळालं.. युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांची जाहीर सभा बारामतीच्या लेंडीट्टा मैदानात सभा पार पडली. तर मिशन हायस्कूलच्या मैदानात अजित पवारांची समारोपाची सभा पार पडली. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार प्रेक्षकांच्या गर्दीत बसल्या होत्या आणि त्यांनी एक बॅनरही झळकावला.

'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडे चांगभलं होतंय' अशा आशयाचं बॅनर झळकावलं आणि कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. दुसरीकडे अजित पवारांच्या सभेसाठी त्यांच्या आई उपस्थित होत्या. देशात बारामतीची ओळख कुणामुळे सगळ्यांना ठाऊक आहे. आम्ही जेवढं बारामतीसाठी केलं, त्यापेक्षा जास्त क्षमता युगेंद्रमध्ये आहे, अशा शब्दात पवारांनी नातू युगेंद्रचं कौतुक केलंय.

'मला मत म्हणजे भाजपला मत असा खोटा प्रचार केला जातोय. असं अजित पवार म्हणालेत. भावनिक न होता मतदान करण्याचं आवाहन त्यांनी बारामतीकरांना केलंय.

युगेंद्र यांचे वडील आणि अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही दादांना टोला लगावलाय. शरद पवार हे कधी रिटायर्ड होणार हे तेच ठरवतील. पवारांच्या रिटायर्डचं पत्र दादांकडे नाही, असा सणसणीत टोला लगावलाय.

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेली बारामतीची निवडणूक भावनिक मुद्यांवर गेली आहे. पवारांच्या शब्दाला मान देऊन युवा नेतृत्वाला बारामतीकर पसंती देणार की अजितदादांनाच पुन्हा आमदार करणार... याची उत्सुकता सा-या राज्याला लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com