Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भयंकर! रील्स बनवताना चिमुकला मधे आला अन् आईने....पुढे जे घडलं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल

Shocking Viral News: रील्स बनवण्याचे वेड कोणत्या थराला जाऊ शकते हे सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय घडले ते पहाच.

Tanvi Pol

Shocking Viral Video: सोशल मीडियाचा वापर जगभर केला जात आहे,मात्र याच्या अति वापराने व्यक्तींच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.अनेक व्यक्ती असो वा चिमुकले सर्व भान विसरुन रील्स व्हिडिओही करत असतात,मग अनेकदा या सर्व गोष्टींमधून भयानक घटना समोर येत असतात.अशात अशीच एक घटना समोर आलेली आहे,ज्यात एक आई रील्स बनवताना इतकी मग्न झाली की व्हिडिओमध्ये तिचा लहान मुलगा आला आण तिने त्याला उचलून बाजूला फेकून दिले आहे.

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ(Video) व्हायरल होत असतात.कधी खळखळून हसवणारे तर कधी अंगाचा थरकाप उडवणारे.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच आहे.यापूर्वीही धोकादायक ठिकाणी रील्स केल्याने काहींनी जीवही गमवावा लागल आहे.मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या महिलेनेही रील्सच्या नादात चक्क आपल्या चिमुकल्याची काळजी करणं विसरली आहे.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचा तीव्र संताप होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला,एक महिला घरात रील्स व्हिडिओ बनवताना दिसत आहे.त्यासाठी ती कॅमेऱ्याच्या समोर डान्स करत असते.काही वेळाने ती डान्स करत असताना तिचा मुलगामध्ये येतो.मात्र त्याला ती उचलून जोरदार पाठी मागे असलेल्या बेडवर फेकून देते आणि पुन्हा डान्स करण्यास सुरुवात करते.सर्व धक्कादायक प्रसंग महिलेने तिचा डान्स व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर समोर आलेला आहे.

धक्कादायक(Shocking) घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे,त्यात तो इन्स्टाच्या ''ek_pravas_asa_pan''या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कमेटबॉक्समध्ये नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''आई आहे की डायन''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''आई नावाला कलंक लावणार हि बाई आहे''अशा संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT